खबरदार, लाच देण्याचा प्रयत्न कराल तर; एसीबीची तिघांवर रिव्हर्स कारवाई

0
351

अवैध धंदे सुरु करण्यासाठी 50 हजाराचे आमिष

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: अवैध धंदे सुरु ठेवण्यासाठी 50  हजाराचे आमिष दाखवणा-या तिघांना ठाणेदाराला पहिल्या हप्त्याची २५ हजाराची रक्कम देतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री रंगेहाथ पकडले. पोलिसांनी लाच मागितल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो. पण या प्रकरणात लाच घेणा-या नाहीतर लाच देणा-यांना पोलिस अधिका-याने पकडून दिल्याचे घडले. याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी ठाणेदार प्रकाश अहिरे यांची प्रशंसा केली आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या शिवा गोपाळराव मगर (30) रा. अकोट, अभिजित रविकांत पागुत (31) रा.  अकोट आणि घनश्याम गजानन कडू रा. लोतखेड ता. अकोट यांनी दहीहंडा पोलीस स्टेशन हद्दीत दारू, वरली मटका आदी अवैध धंदे चालविण्यासाठी 50 हजार रुपये लाच देण्याचे आमिष ठाणेदार प्रकाश अहिरे यांना दाखविले. त्यात तडजोड करून 21 मे रोजी पहिला हप्ता देण्याचे ठरले. मात्र अहिरे वेगळेच निघाले. त्यांनी लाच तर स्विकारलीच नाही. उलट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार, सापळा रचून अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल वि. गायकवाड, अपर  पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला एसीबीचे उपअधीक्षक शरद मेमाणे, हवालदार अन्वर खान, संतोष दहीहाडे, सुनील येलोने यांनी सापळा रचून तिघांना 25 हजार रुपये ठाणेदारास देतांना रंगेहाथ पकडले.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी
ठाणेदाराला लाच देण्याचा प्रयत्न करणा-या तिघांना एसीबीच्या पथकाने पकडले. आरोपींना शनिवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तिन्ही आरोपींना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

Advertisements
Previous articleआतापर्यंत केवळ 36 टक्केच पीक कर्ज वाटप बँकांनी शेतक-यांना प्राधान्य देण्याची गरज
Next articleवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नव्हे, वर्ल्ड डिसीज ऑर्गनाय‍झेशन : प्रकाश पोहरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here