व-हाडात लॉकडाऊन कायम राहणार

0
106

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: राज्यात कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन शिथिल होणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. सोबत रेडझोन असलेल्या जिल्हयांची यादी जाहिर झाली आहे. रेडझोन मध्ये अमरावती विभागातील पाचही जिल्हे समाविष्ट असल्याने आपली अजूनही लॉकडाऊनमधून सुटका नाही असे दिसते.
राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये
अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली
रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिले. तसंच मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here