ना. बच्चू कडूंचा युट्युबकडून सन्मान!

0
140

– सिल्व्हर प्लेट व प्रशस्तीपत्र देऊन गौरव
अकोला: राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू हे युट्युबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या प्रत्येक युट्युबवरील व्हिडिओला लाखो चाहते लाईक्स करतात. त्यामुळे युट्युबवर प्रसिद्ध झालेले पालकमंत्री बच्चू कडू यांचा यूट्यूबने सिल्वर प्लेट व एक प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे.
युट्युबचे दोन प्रतिनिधी हे प्रशस्तीपत्र घेऊन अकोल्यात दाखल झाले होते.  जिल्हाधिकारी कार्यालयात हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत ना. बच्चूभाऊ कडू यांना सन्मानित करण्यात आले.
राजकीय क्षेत्रातील ते राज्यांमधील पहिलेच नेते आहेत, ज्यांना युट्युबने अशा प्रकारे सन्मानित केले आहे. सोशल मीडिया हे घराघरात पोहोचण्याचे उत्तम साधन झाले आहे. अनेक अभिनेते, अभिनेत्री, राजकीय नेते, उद्योगपती व सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे नाव कमविलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा मार्ग अवलंबिला आहे. त्या माध्यमातून ते लाखो नेटिझन्सपर्यंत पोहोचतात. ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या प्रत्येक कॉमेंट्सला, व्हिडिओला, फोटोला नेटिझन्स प्रतिक्रिया देत असतात. अशाच प्रकारे राज्यमंत्री तथा पालकमंत्री बच्चू कडू हे युट्युबवर सक्रिय आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो लोकांनी लाईक्स केले आहे तसेच प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांच्या युट्युबवर 10 लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले आहेत. यामुळे युट्युबने त्यांना सिल्वर प्लेट आणि एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.

Advertisements
Previous articleनिर्माणाधिन पूलात कार कोसळून चौघे शिक्षकांचा मृत्यू
Next articleबच्चूभाऊ बनले युसुफ खॉ पठाण, शासकीय कार्यालयांच्या झाडाझडतीसह मारले अवैध धंद्यावर छापे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here