बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांचा पिकविमा तात्काळ अदा करा- आ. राजेश एकडे

0
217

मंगेश फरपट 
‍व-हाड दूत न्युज नेटवर्क
मलकापूर: सन २०२० मध्ये मलकापूर व नांदुरा तालुकासह बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे. परंतु अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हयातील शेतक-यांना तातडीने पिक विमा देण्यात यावा अशी मागणी आमदार राजेशभाऊ एकडे यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनातून केली.
आमदारांनी 2 जुलैरोजी कृषिमंत्र्यांची भेट घेवून शेतक-यांच्या समस्येबाबत चर्चा केली. शेती करीत असताना शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तडजोडी कराव्या लागतात. मागील पंधरा महिन्यापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकरी आधीच हवालदिल झालेला आहे व पिक विमा मंजूर झाला नसल्याने शेतकरी बांधवांनासमोर गंभीर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. या पूर्वी १७ मे २०२१ रोजी सदर बाबत राज्याचे कृषिमंत्री मा.दादाजी भुसे यांना ईमेल द्वारे निवेदन पाठऊन उपरोक्त मागणी केली होती. आज पुन्हा मुंबईत त्यांच्या मुंबई येथील निवास स्थानी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मलकापूर व नांदुरा तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा पिक विमा तात्काळ अदा करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. कृषिमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवित तात्काळ सचिव कृषीविभाग यांना यासंदर्भात कार्यवाहीच्या सुचना दिल्या आहेत.

Advertisements
Previous articleशेतक-यांच्या पिकविम्यासंदर्भात आघाडी सरकारची चुप्पी- डाॅ. संजय कुटे
Next articleसरकार घराण्यातील उच्यशिक्षित व्यक्तिमत्व गेले; डॉ. रामदास भोंडे यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here