विकृत मानसिकतेच्या युवकाने केले अल्पवयीन बालकाशी अनैसर्गिक कुकर्म

0
143
व-हाड दूत न्युज नेटवर्क
बुलडाणा : एका विकृत मानसिकतेच्या युवकाने ११ वर्षीय बालकाला खाऊचे आमिष दाखवून जंगलात नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक कुकर्म करण्यात आल्याची घटना मेहकर तालुक्यातील निंबा गावात 2 जुलैच्या सायंकाळी साढेचार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी जानेफळ पोलीसांनी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला असून हा विकृत आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
 पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधिक वृत्त असे की, जानेफळ येथील गणेश बुटाले 25 या आरोपी ने तो राहत असलेल्या भागातीलच एका बालकाला खाऊचे आमिष दाखवले. चल तुला खाऊ देतो असे म्हणत त्याला निंबा शिवारातील जंगलात नेले. तेथे चाकूचा धाक दाखवत त्याच्यावर अनैसर्गिक कुकर्म केले. या प्रकारानंतर अल्पवयीन बालकास वेदना होऊ लागल्याने त्याने आपल्या आई- वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. हकीकत ऐकून धक्का बसलेल्या बालकाच्या वडिलांनी जानेफळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गणेश बुटाले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित बालक अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने आरोपीविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यमावार करीत आहेत.
Advertisements
Previous articleडॉ. डी. एस. तळवणकर यांची प्राचार्यपदी पुनर्नियुक्ती
Next articleसारीमुळे अकोल्यात 20 जणांचा मृत्यू 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here