आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान योजना

0
207

बुलडाणा : आर्थिक विवंचनेतील आदिवासी बांधवांना आधार देणारी खावटी अनुदान योजना एक वर्षासाठी सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेत पात्र लाभाथ्र्यांना नोंदणीचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुरूवातीला लागू करण्यात आलेले लॉकडाऊन नंतर संचारबंदी आदींमुळे विविध अडचणी उभ्या राहील्या. आदिवासी बांधवांपुढेही रोजगाराची अडचण उभी राहीली. त्यामुळे जिल्ह्यात मनरेगातंर्गत विकास कामे गतीने राबविण्यात येवून रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. आता खावटी योजनाही लागू करण्यात आली आहे. सन २०१३-१४ पासून ही योजना बंद होती. आता या योजनेत १०० टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार ही योजना एक वर्षासाठी सुरू ठेवण्यात येणार आहे.

Advertisements
Previous articleअकोला-खंडवा ब्रॉडगेज अंबाबरवा अभयारण्यातुनच जैसे थे ठेवा – खा. नवनीत राणा
Next articleबुलडाणा जिल्ह्यात आज 151 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here