काय सांगता: आंघोळ करतानाचे महिला पोलीसाचे काढले फोटो!

0
525

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचारीचे चक्क प्रायवेट फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर बुलडाणा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.या प्रकरणी पिडीत महिला पोलिस कर्मचारीने दिलेल्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की , पोलिस दलात कार्यरत एका महिला कर्मचारीचे अंघोळ करतांनाचे खाजगी फोटो तिच्या ई-मेल आयडीवर सेव्ह होते. हा ई-मेल आयडी हॅक करुन जवळपास ३० प्रायवेट फोटो पिडीत महिला पोलिस कर्मचारीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर एका क्रमांकाने अश्लील संदेश लिहून पाठविण्यात आले. ही बाब पिडीत पोलिस महिला कर्मचारीच्या लक्षात येताच तिने बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे . यावरुन अज्ञात मोबाईल धारक आरोपीवर विनयभंगाची कलम ३५४ , ३५४ (ड) आयटी ॲक्टचे ६६ (सी), ६६ (ई),६७ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येणार आहे . तपासाअंती पिडीत महिला पोलिस कर्मचारीचे नग्न फोटो कोणी व्हायरल केले हे समोर येणार असून याप्रकरणी पुढील तपास दत्तात्रय नागरे हे करीत आहे .

Advertisements
Previous articleपावसाने नुकसान झालंय; 72 तासात विमा कंपनीला द्या माहिती
Next articleअकोल्यात 40 हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here