जितेंद्र पापळकर हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी

0
409

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून भाप्रसे रुचेश जयवंशी कार्यभार सांभाळत आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश ३० जुलैरोजी संध्याकाळी काढले.
गेल्या आठवड्यात राज्यातील आयएएस अधिका-यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये अकोला जिल्हाधिकारी म्हणून महापालिकेच्या आयुक्त निमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि भाप्रसे जितेंद्र पापळकर यांची मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. मात्र पापळकर त्याठिकाणी रूजू झाले नव्हते. आज संध्याकाळी प्राप्त झालेल्या आदेशानुसार जितेंद्र पापळकर यांची हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

Shri J.S. Papalkar IAS Transfer Order Dt. 30.07.2021

Advertisements
Previous articleनातेवाईकाने केला १२ वर्षीय मुलीवर अत्याचार
Next articleगोंधनापूर चा किल्ला एक भुईकोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here