आता गावांची तयारी गाव हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी..

0
576

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

-सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधेला महत्व
-१५ ऑगस्ट रोजी करणार घोषणा
अकोला : जिल्ह्यातील ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्यानंतर या ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधा उपलब्ध करून घेत गाव स्वच्छ व निर्मळ ठेवण्यासाठी प्रयत्न करीत हागणदारीमुक्त अधिक गाव ODF PLUS घोषित करण्याकरिता ग्रामपंचायती पुढाकार घेत आहे. यासाठी 15 ऑगस्ट 2021 रोजी जिल्ह्यातील 5 गाव तयारीला लागले आहे. या गावांमध्ये 100% वैयक्तिक शौचालयाच्या उपलब्धी सोबतच सांडपाण्याच्या व घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधा वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर उपलब्ध झाले असेल तर काही सुविधा निर्माणाधीन आहे. मंगळवार बुधवार रोजी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजू फडके यांनी प्रत्यक्ष भेटी देत गावांची पाहणी केली. याबाबत राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून प्राप्त निर्देशानुसार 15 ऑगस्ट रोजी संभाव्य ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घोषित करण्यासाठी अकोला तालुक्यातील कापशी रोड, बार्शीटाकळी तालुक्यातील पाटखेड, गोरव्हा, मूर्तिजापूर तालुक्यातील मधापुरी, राजनापूर खिंखिनी, ग्रामपंचायत कामाला लागले आहेत. या पाचही ग्रामपंचायतीला पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांच्या जिल्हा टीमने प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामपंचायतींच्या सुविधांची पाहणी केली व गाव हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी उपाय योजना सुचविल्या. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजीव फडके, मूर्तिजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री बाळासाहेब बायस, विस्तार अधिकारी विजय कीर्तने यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष चे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश डहाके, अर्चना डोंगरे, मूल्यांकन व संनियंत्रण सल्लागार राहुल गोडले, स्वच्छता तज्ञ सागर टाकले, मनुष्यबळ विकास सल्लागार प्रवीण पाचपोर, पाणी गुणवत्ता सल्लागार ममता गणोदे, गटसमन्वयक सुरेश मानकर, देवानंद वजीरे आदी उपस्थित होते
या सुविधांवर राहणार भर
हागणदारीमुक्त शाश्वतता
गावातील शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी शौचालय सुविधा उपलब्ध असणे फिरत्या व स्थलांतरित लोकसंख्येसाठी सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध असणे लोकांमध्ये शाश्वत ते बाबत कायम जाणीव राहावी यासाठी शौचालयाचा वापर सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन स्वच्छतेच्या सुविधा गाव हागणदारी मुक्ती ची गरज या विषयाचे संदेश गावांमध्ये दृश्यांत करणे आवश्यक आहे
घनकचरा व्यवस्थापन
यामध्ये गावातील सार्वजनिक ठिकाणी तसेच किमान 80 टक्के कुटुंबांकडे निर्माण होणार आहे कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर कंपोस्ट पीठ सार्वजनिक पीठ कचरा संकलन करणारी पुरेशी यंत्रणा व प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन यासाठी गावाने तयार केलेल्या सुविधा पाहिल्या जाणार आहे
सांडपाणी व्यवस्थापन
गावातील सार्वजनिक ठिकाणी तसेच 80 टक्के कुटुंबांकडे निघणाऱ्या सांडपाण्याचे वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर शोषखड्डे, भूमिगत गटार नाल्या व स्थिरीकरण तळे याच्या माध्यमातून सांडपाण्याचे व्यवस्थापन असणे सुविधा असणे गरजेचे आहे
एकंदरीत गावांमध्ये कमीत कमी कचरा निर्मिती, उघड्यावर सांडपाणी न वाहने, प्लास्टिक कचरा निर्मिती नसणे. यासाठी गोरव्हा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश खांबलकर, पाटखेड चे महादेव मानकर, कापशी रोड चे अंबादास उमाळे, राजनापूर किंकिणी च्या सरपंच सौ प्रगती रुपेश कडू, मधापुरी चे सरपंच श्री प्रदीप ठाकरे यांच्यासह ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक परिश्रम घेत आहेत.

Advertisements
Previous articleवेतनवाढीसाठी MSACS कर्मचा-यांचे आंदोलन
Next articleभारिपचे पाहिले आमदार व मंत्री मखरामजी पवार यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here