बुलडाणेकरांनो सावधान: कोरोनाचा धोका वाढतोय! आज १८४ पॉझिटिव्ह, आतापर्यंत ८४ लोकांचा मृत्यू

0
207

बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे प्राप्त झालेल्या अहवालापैकी १८४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून कोरोनाचा धोका वाढत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यात ८४ लोकांचा मृत्यू झाला असून कोरोना रुग्णांची संख्या ६६०३ पर्यंत पोहचली आहे.
पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : चिखली शहर:5, चिखली तालुका: मेरा बू 2, सवणा 1, आंबाशी 4, सातगाव भुसारी 1, शिरपूर 1, करत वाडी 1, खामगाव शहर : 22, खामगाव तालुका : हिवरखेड 1, शिर्ला नेमाने 1, घाटपुरी 1, नांदुरा शहर : 13, जळगाव जामोद शहर : 9, जळगाव जामोद तालुका : वाडी खु 1, वडशिंगी 5, शेगाव शहर : 3, शेगाव तालुका : पहूर जीरा 1, कन्हारखेडा 3, भोनगाव 1, मोताळा तालुका : वडगाव 1, मोताळा शहर :2, मलकापूर शहर : 5, मलकापूर तालुका : झोडगा 1, सिंदखेड राजा तालुका : दुसरबिड 1, तडेगाव 3, साखर खर्डा 1, लोणार तालुका : तांबोळा 5, लोणार शहर :2, मेहकर तालुका : पिंपळगाव माळी 2, सोनाटी 2, कदमापुर 1, आरेगाव 2, कनका 2, दे. माळी 1, मेहकर शहर : 13, बुलडाणा शहर :32, बुलडाणा तालुका : दहिद बू 2, घानेगाव 1, सातगाव 1, दे. राजा शहर : 12, दे. राजा तालुका : आसोला 1, दे. माही 11, गिरोली खु 1, संग्रामपूर तालुका : बोडखा 1, मूळ पत्ता भुसावळ जि. जळगाव 1, औरंगाबाद 1, संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 184 रूग्ण नवीन रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान धरणगाव ता. मलकापूर येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
तसेच आज 127 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : कोवीड केअर सेंटर नुसार : खामगांव : 27, शेगांव : 24, मलकापूर : 3, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 18, अपंग विद्यालय 1, चिखली :15, लोणार : 19, मोताला: 3, मेहकर :2, नांदुरा :13, जळगाव जामोद:5, तसेच आजपर्यंत 28824 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5431 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5431 आहे.
आज रोजी 1030 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 28824 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6603 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5431 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1088 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 84 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleअकोल्याच्या प्रेमीयुगुलाची रेल्वेखाली आत्महत्या
Next articleबंद शाळेत मसन्या उदच्या तीन पिल्लांचा हैदोस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here