दुसरबीडजवळ टिप्पर उलटले, समृद्धी च्या कामासाठी जाणारे १० मजूर ठार

0
376

व-हाड दूत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीडजवळ टिप्पर उलटून झालेल्या अपघातात १० पेक्षा अधिक मजूर ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही जखमी झाले आहेत.
समृद्घी महामार्गाच्या कामासाठी मजूरांना घेवून टिप्पर चालले होते. हे टिप्पर दुसरबीडजवळील ताडगावमध्ये पलटी झाले. या टिप्परमध्ये १५ ते २० मजूर होते. टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघातात १० जण जागिच ठार झाल्याचे सुत्रांनी सांगितले. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाऊस चालू असल्याने वळणमार्गावर टिप्पर चालकाकडून कंट्रोल झाले नाही. त्यामुळे अपघात घडला. जखमींना नजीकच्या ग्रा्मिण रुग्णालयात भरती केले आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहे.

Advertisements
Previous articleदारूचा धंदा चालू देतो; दोन हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाविरुद्ध गुम्हा दाखल
Next article” गाव निघालं शिकायला”! अभियानाचा प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here