कुपोषण घालवू धरु सुपोषणाची संगत, स्थानिक आहाराची झडू दे पंगत!

0
461

पोषण माहचा काटा येथे थाटात शुभारंभ, सप्ताहात विविध कार्यक्रम
व-हाड दूत न्युज नेटवर्क
वाशीम: कुपोषण घालवू धरु सुपोषणाची संगत, स्थानिक आहाराची झडू दे पंगत .. या घोषवाक्यासह महिला व बालविकास विभाग पोषण माहसाठी सज्ज झाला आहे. 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महीनाभर जनजागृती रॅली, प्रचार, प्रसारासह, परसबागांचे महत्व, आरोग्याची पंचसुत्री यासारखे कार्यक्रम पार पडणार आहेत. जिल्हयात या अभियानाचा शुभारंभ काटा येथे झाला.
राष्ट्रीय स्तरावर “पोषणअभियानाची” सुरवात 2018 पासून करण्यात आली आहे. संपूर्ण सप्टेंबर महिना “पोषणमाह” म्हणून साजरा केला जातो, यामध्ये गरोदर, स्तनदा माता, 6 वर्षापर्यंतची बालके यांच्या आहारात पोषणाचे महत्व वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रबोधन करतात व विविध कार्यक्रम राबविले जातात. वाशिम जिल्ह्यातही पोषणमाहचा शुभारंभ काटा येथे पंचायत समिती उपसभापती सौ.जाधवताई यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी गरोदर मातेचे ओटीभरण घेऊन पतीसमक्ष आहाराचे महत्व समजून देण्यात आले. त्याचबरोबर “पोषणप्रतिज्ञा” घेण्यात आली. “पोषणरॅली” काढण्यात आली. तसेच पोषक “पाककला रेसिपीचे” प्रदर्शन भरवण्यात आले होते. 30 सप्टेंबरपर्यत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याप्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कु.प्रियांका गवळी, पर्यवेक्षिका सौ. सुळे, धोटे, वानखेडे, गट समन्वयक शेख उपस्थित होते.
महिनाभर असे होतील कार्यक्रम
गरोदर, स्तनदा माता व आयसीडीसीएस कर्मचा-यांचे 100 टक्के लसीकरण, गृहभेटी, गरोदर स्त्रीयांची आरोग्य तपासणी व समुपदेशन, माझे मुल माझी जबाबदारी, तालुकास्तरीय आरोग्य शिबिर, समुदाय आधारीत कार्यक्रम, कमी वजनाच्या बालकांचे आरोग्याबाबत चर्चा, गणेशोत्सवात जनजागृती, परसबागेबाबत जनजागृती, ऑनलाईन पूर्व शालेय शिक्षण कृती, कुपोषित बालकांच्या भेटी, हात धुणे व वैयक्तीक स्वच्छता, महिला बचत गटांची सभा, सृद्ढ बालक स्पर्धा, जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा, आयवायसीएफ बाबत जनजागृती, माता समिती सभा, मुलींच्या जन्माचे स्वागत, पोषण अभियान प्रतिज्ञा व समारोप यासारखे विशेष कार्यक्रम होत आहेत.


सशक्त माता व सशक्त बालक निर्माणासाठी जे जे करता येईल ते सर्व आम्ही या पोषण माहमध्ये करणार आहोत. त्याचे सर्व नियोजन झाले आहे. खास करून आरोग्या इतकंच महत्व व्यायाम व योगाला असल्याने विशेष करून योगाविषयीही जनजागृती केली जात आहे. माता भगिनींनी या उपक्रमात हिरिरीने सहभागी व्हावे.
– कु. प्रियांका गवळी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी,वाशीम.

Advertisements
Previous articleआगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार –  बाळासाहेब थोरात
Next articleसार्वजनिक खासगी गुंतवणुकीद्धारे राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, अतिविशेषोपचार रुग्णालये स्थापन करणार: मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here