श्री बाराभाई गणपती मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा रेड क्रॉस सोसायटीने केला सन्मान

0
227

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: मिरवणूक व महापूजेची परंपरा कोरोना काळामुळे खंडित झालेली असताना मानाच्या श्री बाराभाई गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून रेड क्रॉस सोसायटीने आमचा उत्साह द्विगुणीत केला असे मंडळाचे अध्यक्ष धर्मनाथजी इंगळे यांनी सांगितले.
एकशे पंधरा वर्षापासून कार्यरत असलेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक सत्कार हा आमच्यासाठी अविस्मरणीय आहे असे यावेळी सेवाधारी जगदीश पाठक यांनी मंडळातर्फे सांगितले. पंचवीस वर्षापासून बाराभाई गणपतीचे पूजन व स्वागत रेड क्रॉस तर्फे करण्यात येत आहे परंतु कोरोनाच्या निर्बंधामुळे ही परंपरा अखंड जोपासणाऱ्या बाराभाई मंडळाच्या पदाधिकार्‍ यांचा सत्कार हा रेड क्रॉसचा बहुमान आहे असे उपाध्यक्ष डॉक्टर किशोर मालोकार यांनी सत्कार करताना सांगितले.

यावेळी श्री इंगळे, विश्वस्त जगदीशनाथ पाठक, नरेंद्रभाऊ इंगळे, विलास मोरे, ज्येष्ठ सदस्य कैलास मोरे, विनोद इंगळे, श्याम इंगळे, विजय पाठक, प्रदीप चाळसे, हरिहर पारस्कर, राहुल इंगळे, रुपेश शर्मा, नागेश इंगळे, रुपेश इंगळे व दीपक ठाकरे या पदाधिकाऱ्यांचा शाल व हारार्पण करून सत्कार करण्यात आला. रेड क्रॉस तर्फे अमर गौड़, सी ए मनोज चांडक, नंदकिशोर जोशी, अरुंधतीताई शिरसाट, डॉक्टर आर. बी. हेडा, प्रकाश अंधारे, अजय सेंगर, एडवोकेट सुभाष मुंगी, तनवीर अहमद खान, शैलेंद्र अग्रवाल, राहुल दोशी, मोहन काजळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते प्रारंभी सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी या सत्कारा बद्दल माहिती देऊन आभार प्रदर्शन केले.

Advertisements
Previous articleस्वच्छतेच्या यज्ञात अनेकांनी टाकल्या समिधा!
Next article“खाकीतील” कर्तव्यनिष्ठेच्या वर्षपूर्तीला सॅल्यूट! एसपी अरविंद चावरिया ठरताहेत गुन्हेगारांचे कर्दनकाळ!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here