कृषिकन्येचे शेतक-यांना अझोलाबाबत मार्गदर्शन

0
100

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
खामगाव: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ संलग्नित स्वामी विवेकानंद कृषि महाविद्यालय हिवरा आश्रम येथील अंतिम वर्षाची विद्यार्थीनी सपना संतोष इंगळे हीने ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील कदमापूर येथील शेतक-यांना अझोला या पशुखाद्याचे मार्गदर्शन व उत्पादन करून दाखवले.
अझोला वनस्पती हे पशुखाद्य दुधारू जनावरांसाठी एक नैसर्गीक वरदान आहे. हे समस्त शेतक-यांना व गावक-यांना पटवून दिले. दुधाळ जनावरे जसे गायी, म्हशी, बक-या इत्यादी पाळीव जनावरांना अझोला खायला दिल्यास त्यांच्या दुध देण्याच्या क्षमतेत वाड होवून वजनात सुद्धा वाढ होते व शरिर निरोगी राहते. तसेच कुक्कुटपालन करणा-यांनी कोंबड्यांना अझोला दिला तर कोंबड्यांची अंडी देण्याच्या क्षमतेत वाढ होते. अझोला या पशुखाद्यात विटॅमिन, ए.बी.12, बायोकॅरोटीन, कॅलशीअम, फॉफ्सरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅगनेशिअम, प्रथीने तसेच मिनरल, अमिनो, अॅसिड किती प्रमाणात आहे. याबाबत सविस्तर माहिती दिली. अझोला देण्याची पद्धत व प्रमाण व इतर फायदे याचबरोबर प्रत्यक्ष प्रात्याक्षिक करून दाखवले. कशापद्धतीने अझोला निर्मिती करावी व कोणत्या बाबींची काळजी घ्यावी. अझोला हा अती स्वस्त असून त्याचा फायदा शेतक-यांना नक्कीच होतो. याचे सखोल मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमात कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कालवे, प्रा. एम.व्ही. खोडके, प्रा. एम.एम.जकाते, प्रा.हमाने यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सरपंच रोहीणी पवार, उपसरपंच सुजाता इंगळे, ग्रा.प.सदस्य पवन पवार, निळकंठ इंगळे, सैनिक सुनिल सावदेकर, अक्षय इंगळे, ज्ञानदेव गुरव, इंद्रजीत इंगळे, विलास गुरव, रविंद्र इंगळे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Advertisements
Previous articleआता अर्धवट राहिलेली बी.एस्सी. ची पदवी करा पूर्ण
Next articleअकोल्यात महिला सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांची अनोखी मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here