अकोल्यात पावसाचे थैमान, पूरात ५० जनावरे गेली वाहून

0
172

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: जिल्हयात शनिवारी मुसळधार पावसाने थैमान घातले. सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर आला असून पातूर तालुक्यात निर्गुणा नदीच्या पूरात ५० ते ६० जनावरे वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
अकोला जिल्हयातच नव्हेतर शेजारी असलेल्या अमरावती, बुलडाणा, वाशीममध्येही गेल्या दाेन दिवसापासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे अकोला जिल्हयाच्या परिसरात असलेल्या नाले व नद्यांना पूर आला आहे. शनिवारी पातूर तालुक्यात अतिवृष्टी झाली. यामुळे निर्गुणा नदीला मोठा पूर आला. दरम्यान आंधसावंगी येथील ५० ते ६० जनावरे पूरात वाहून गेली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने जनावरांचा शोध घेणे कठीण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Advertisements
Previous articleन्यूजपोर्टलधारकांचा रविवारी ऑनलाईन महामेळावा
Next articleचालकाचा आगाऊपणा नडला, बस पूरात टाकली, चौघांना जलसमाधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here