चालकाचा आगाऊपणा नडला, बस पूरात टाकली, चौघांना जलसमाधी

0
313

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुसद-उमरखेड रस्त्यावरील दहागाव पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने बस पुलावरून नाल्यात कोसळल्याची घटना २८ सप्टेंबररोजी सकाळी घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून तिघे प्रवाशी बेपत्ता आहेत. मृतकांमध्ये चालक व वाहकाचा समावेश आहे.

मागील दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच मंगळवारी सकाळी नागपूर आगाराची एमएच 14 बी.टी.5018 या क्रमांकाची बस उमरखेड येथून काही प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. दरम्यान उमरखेड पुसद मार्गावर दहेगाव नाल्यावर मोठा पूल असुन दोन दिवसांपासून या पुलावरून पाणी वाहत आहे. असे असताना बस चालकाने नाल्यावरून बस काढण्याचा प्रयत्न केला. परिसरात असलेल्या नागरिकांनी बसला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पूलाचा अंदाज न आल्यामुळे बस पाण्यात कोसळली.प्राथमिक माहितीनुसार यात एकाचा मृतदेह हाती लागले असून तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर बेपत्ता असलेले ड्रायव्हर व चालकास व इतर प्रवाशांच्या शोधकार्य बचाव पथकातर्फे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अशी अधिकृत माहिती यवतमाळ जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

Advertisements
Previous articleअकोल्यात पावसाचे थैमान, पूरात ५० जनावरे गेली वाहून
Next articleबुलडाण्यात गेल्या 6 वर्षांत 30 जणांना जलसमाधी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here