जखमीस रुग्णालयात पोहचवा अन मिळवा ५ हजार रुपये

0
114

केंद्र सरकारची नवीन योजना

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
दिल्ली: अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेल्यास 5000 रुपये बक्षीस मिळणार आहे. केंद्र सरकारच्या नवीन योजना रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हि योजना जाहीर केली आहे. येत्या 15 ऑक्टोबर 2021 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाईल असे सांगण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही रक्कम दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, रस्ते वाहतूक मंत्रालयामार्फत नवे पोर्टल सुरु केले जाईल. या पोर्टलवर जिल्हा प्रशासन दर महिन्याला जखमींना मदत करणाऱ्या नागरिकाचे नाव, पत्ता, आणि मोबाइल नंबर अशी माहिती समाविष्ट करेल. मदत करणाऱ्या व्यक्तीला जिल्हा प्रशासनाकडून 5000 रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार – मात्र ही रक्कम एका वर्षात जास्तीत जास्त पाच वेळा दिली जाणार आहे. मदत करणार्यांना संरक्षणही मिळणार आहे. असे आढळून आले आहे की, काही घटनांमध्ये नागरिकांना स्वतःची ओळख देण्याची इच्छा नसते. अशा व्यक्तींना रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कायदेशीर संरक्षण दिले आहे. यामध्ये पोलीस प्रशासन नागरिकाला ओळख,पत्ता आणि मोबाइल नंबर देण्यासाठी दबाव आणू शकणार नाही. तसेच एखाद्या नागरिकांना स्वेच्छेने आपली ओळख उघड करायची असल्यास ते करु शकतात किंवा साक्षीदार म्हणून न्यायालयात हजर राहू शकतात. असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisements
Previous articleभाऊसाहेबांनी सुरु केलेला ज्ञानयज्ञ निरंतर तेवत ठेवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज: केशवराव मेतकर
Next articleज्ञानाचा सजग वापर सामर्थ्यवान देश निर्मितीसाठी करावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here