मनसेच्या बुलडाणा जिल्हा उपाध्यक्षपदी अशोक पाटील तर खामगाव शहराध्यक्षपदी आनंद गायगोळ

0
174

खामगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसे राज्य उपाध्यक्ष तथा शाडो कॅबिनेट मंत्री आनंद एंबडवार व मनसे शाडो कॅबिनेट मंत्री विठ्ठल लोखंडकार व राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी स्वरूपाच्या सहा महिन्याकरीता किंवा राज ठाकरे यांचा पुढील आदेशापर्यंत जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी अशोक पाटील यांची तर खामगाव तालुका अध्यक्षपदी जयराम सातव तसेच खामगाव शहर अध्यक्षपदी आनंद गायगोळ,  तालुका उपाध्यक्षपदी आकाश वानखडे व आकाश परकाळे, शहर उपाध्यक्ष पदी सागर बावस्कर व डॉक्टर अभिजीत महानकर  यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisements
Previous articleखामगाव न.प. पाणीपुरवठा विभागाचा मनमानी कारभार
Next articleबुलढाणा जिल्ह्यात आज 167 पॉझिटिव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here