स्वार्थासाठी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या काँग्रेस सरकारचा निषेध

0
51

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोला: आज भारतीय जनता युवा मोर्चा अकोला महानगर च्या वतिने माननीय खासदार संजयजी धोत्रे , भाजपा जिल्हाध्यक्ष रणधिरभाऊ सावरकर,आमदार गोवर्धनजी शर्मा, भाजपा शहरअध्यक्ष विजयजी अग्रवाल ,आमदार वसंतजी खंडेलवाल, महापौर अर्चनाताई म्हसने यांच्या मार्गदर्शनाखाली ,भाजयुमो शहराध्यक्ष उमेशजी गुजर यांच्या नेतृत्वात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाबमध्ये ताफा अडविल्या प्रकरणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस शासित प्रदेशात आज जे गलिच्छ राजकारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत खेळल्या गेले हे अतिशय लाज घालवणारे आहे.
पंजाबमधील काँग्रेस सरकारला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा माहीत असतांना सुद्धा त्याबाबत माहिती देऊन मोदींचा ताफा एका ब्रीज वर अर्धा तास अडकवला जातो हे अत्यंत घोर चुक आहे. राजकारणातील प्रतिस्पर्धीला हरवल्या जात नसेल तर त्याच्या जीवावर उठून खालच्या पातळीवर वर जाऊन राजकारण करणं ह्या त्यांच्या जुन्या परंपरेला शोभेल अस कृत्य काँग्रेसने केलं आहे.
आंदोलनात युवा मोर्चा महानगर सरचिटनीस उज्वलजी बामनेट, अभिजीतजी बांगर,निलेशजी काकड़ मंडल अध्यक्ष भूषणजी इंदौरिया, अभिषेकजी भगत, टोनीजी जयराज, वैभवजी मेहरे , रितेशजी जमनारे , केशवजी हेडा व मयूर शर्मा , नितिन राउत , ऋषिकेश श्रीवास्तव , विकी भीसे ,अमोल गीते, आदित्य वानखडे, यश सेकासरीया व युवा मोर्चा चे सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थिति होते.

Advertisements
Previous articleपहिली ते आठवीच्या शाळा पुन्हा बंद, ऑनलाईन वर्ग होणार
Next articleकोविडःआरटीपीसीआर ८५ तर रॅपिड ॲन्टीजेन पाच पॉझिटीव्ह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here