गॅस दरवाढीविरोधात अकोला जिल्हा महिला काँग्रेसचा एल्गार

0
68

महिलांनि संक्रांतच्या वाणात दिले एकमेकिना प्रतिकात्मक सिलिंडर
वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : भाजप प्रणित केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने अकोला शहरातील जुने इन्कम टॅक्स चौकात रविवारी संध्याकाळी 6 वाजता तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सत्तारूढ भाजप सरकारच्या फसव्या उज्वला गॅस योजनेचा निषेध केला.
अ भा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नीता डिसुझा यांच्या आदेशान्वये व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनात राज्यात सर्वदूर महिला काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने अकोला महानगरातही जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी तीव्र निदर्शने करण्यात आलीत. याला महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत यात सहभाग घेतला.गोरक्षण मार्गावरील जुन्या इन्कम टॅक्स चौकात महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे यांच्या नेतृत्वात या वेळी मोदी सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्यात. अनेक महिलांनी ‘वारे मोदी तेरा खेल उज्वला योजना हो गई फेल,व ‘मोदी सरकार हाय हाय” असे नारे देत केंद्र सरकारच्या प्रति रोष व्यक्त करीत संक्रांत पर्वावर वाणात प्रतिकात्मक सिलिंडरचे वितरण करण्यात आले.यावेळी हळदी कुंकाच्या रुपात येणार्‍या जाणार्‍या महिलांना हे वाणरुपी सिलेंडर वितरित करण्यात आले.केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत जनमानसाची दिशाभूल करीत उज्वला गॅस योजना महिलांसाठी कार्यान्वित केली होती.परंतु सदर योजना सपेशल फेल ठरली असून महिलांनी या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. या आंदोलनात संगीता आत्राम,गीता उंदरे,स्वाती पोधाडे,अनिता तिवारी,पूजा खंडारे,जिजाबाई खंडारे,प्रीती पवार,प्रमिला जोगी,बेबीताई सोळुंके,शोभा यादव,चंद्रकला मस्के,मो इरफान,अंकुश भेंडेकर,रहमान शाह,सुनील रत्नपारखी आदि सह भागी झाले होते.

Advertisements
Previous articleपारस प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्या – माजी आमदार लक्ष्मणराव तायडे
Next articleअकोल्याच्या मातीत रुजले ‘सफरचंद’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here