रूग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा -आ. डाॅ. संजय कुटे ; शेगाव तालुक्यातील पहिले शासन मान्य कोविड रूग्णालय रूग्ण सेवेत

0
791

शेगाव : कोरोनाचे धर्तीवर शेगावात तालुक्यातील पहिले शासन मान्य कोविड रूग्णालयाचा शुभारंभ आ. डॉ. संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आला. तर कोरोनाची धास्ती न धरता प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, त्यातही बाधित झालाच तर शासकीय रूग्णालयासोबतच डॉ अविनाश सोळंके यांचे शासन मान्य कोविड हेल्थ केअर सेंटर मध्ये बाधित रूग्णांना सोयी सुविधा युक्त कोविड रूग्णालय शेगाव येथे सुरू झाले असून आता रूग्णांनी घाबरू नये, चांगले पध्दतीने निदान उपचार होत आहेत. खाजगी डॉक्टर व शासकीय डॉक्टरांनी आपसात समन्वयाची भुमिका ठेवून कोरोना बाधित रूग्णांना वेळेवर योग्य तो उपचार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा,रूग्ण सेवा हीच खरी ईश्वरी सेवा असून सेवा भाव जपावा, असे आवाहन आ.डॉ. संजय कुटे यांनी उद्घाटनपर भाषणात केले. कॉग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी कोविड रूग्णालयामुळे बाधितांना आधार मिळाला असून डॉ अविनाश सोळंके यांचे निर्णयाचे स्वागत केले. प्रास्ताविकात समाधान सोळंके यांनी कोविड हेल्थ केअर सेंटर मधील सोयीसुविधांची माहिती दिली.
शेगाव परिसरातील रुग्णांसाठी सुविधा
कोविड 19 रुग्णांसाठी डॉ. अविनाश सोळंके यांचे कोविड हेल्थ केअर सेंटरचे शुभारंभ झाला आहे. कोविड सेंटर येथे 20 स्पेशल रुम्स 3 आयसोलेटेड वार्ड असे संपुर्ण 40 बेडेड कोविड हेल्थ सेंटर व ऑक्सिजन व्यवस्था रूग्णान करिता चहा /नास्ता व दोन वेळ जेवण ची व्यवस्था, अनुभवी व तज्ञ डॉक्टरस् व कर्मचारी वर्ग रूग्ण सेवेत 24 तास राहतील, तरि रुग्णानी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक डॉ अविनाश सोळंके यांनी यावेळी केले.यावेळी नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, पांडुरंग बुच, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण घोंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचलन धनाजी फड यांनी केले.

Advertisements
Previous articleअकोला मेडीकल कॉलेजच्या डीन डॉ. मिनाक्षी गजभिये यांच्या पतीचे कोरोनाने निधन
Next articleसोशल मिडीयावर ‘कपल चॅलेंज’ ची धूम ; नवरा- बायकोंचे फोटो शेअर करण्याचा आला ट्रेंड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here