एका हाताने टाळी वाजविणा-या अमोल अनासने यांनी बनवले दोन नवीन विश्वविक्रम

0
663

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला- एका हाताने टाळी वाजत नाही ही पूर्वापार चालत आलेली प्रचलित म्हण खोठी ठरवुन एका हाताने टाळी वाजवुन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विश्व विक्रमांचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या स्थानीय जुन्या शहरातील अमोल अनासने या युवकाने दोन नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत.
अमोलला वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या विक्रमाची नोंद करणाऱ्या संस्थेने दोन विक्रमांचे प्रमाणपत्र,दोन मेडल व बॅच देऊन सन्मानित केले आहे.यामुळे त्याच्या विक्रमांच्या खजिन्यात आणखी दोन महत्वपूर्ण पुरस्कारांची भर पडली आहे.या विक्रमात “फास्टेस्ट वन हँड क्लापिंग इन ए मिनिट” व एका हाताने एका मिनिटात 300 पेक्षा जास्त टाळी वाजवून रेकोर्ड बनवले आहे ‘मोस्ट अल्टरनेट वन हँड क्लापस इन वन मिनिट” एका मिनिटात दोन्ही हाताने सवार्त जास्त 400 पेक्षा जास्त टाळी वाजवुन विक्रम आपल्या नावर केला आहे. हा जागतिक विक्रम केला आहे.अमोलने या विक्रमाची व्हिडिओ क्लिपिंग वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाला देत हा विक्रम 21ऑगस्ट 2021 ला केला होता. वर्ल्ड रेकॉर्डची नोंद 10 डिसेंबर 2021 वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया तर्फे घेण्यात आली.त्यांच्या वेबसाईटला या विक्रमाची माहिती प्रदर्शित केली आहे.अमोलला वर्ल्ड रेकोर्ड इंडिया व जिनियस फाउंडेशनचे मुख्य संपादक पवन सोलंकी यांच्या तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले.अमोलने या आधी नॉन स्टॉप वन हँड क्लापिंग रेकोर्ड केला होता . अमोल ने नॉन स्टॉप एका हाताने 1 तासात 7 हजार टाळी वाजवून विश्वविक्रम केला होता व एका हाताने टाळी वाजत नाही ही पूर्वापार चालत आलेली प्रचलित म्हण खोठी ठरवली होती.ज्या लोकांना एक हात आहे त्यांच्या करिता ही कला प्रेरणादायी ठरू शकते.आता पर्यंत अमोलने असे तीन विक्रम केले आहेत.अमोलला इंटरनेशनल आयकॉन 2022 मिळाला असून इंडियन आयकॉन अवॉर्ड 2022 पुरस्कारही मिळाला आहे.तसेच इंडिया स्टार रिपब्लिक अवॉर्ड 2022 पण मिळाला असून अमोलने आता पर्यंत 23 वर्ल्ड रेकॉर्डचे सर्टिफिकेट व 28 पेक्षा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रमांचे पुरस्कार प्राप्त केले असून आतापर्यंत त्याचाकडे 63 प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत.या पुरस्कारांमुळे महानगराचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.अमोलच्या या उपलब्धी बद्दल त्याचे नगरसेविका मंजुशा शेळके,विलासराव अनासाने,एड मुन्ना खान,नितीन लोया, रमेश वानखडे,
राजेंद्र बंब,सचिन ठोसर,एड दुशांत चौहान,अशोक उंबरकार,गजानन उज्जैनकर,मधुकर रत्नपारखी,महेंद्र दैवैज्ञ,महेंद्र मोहोकार समवेत वीर हनुमान व्यायाम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Advertisements
Previous articleजि.प. शाळा किनखेड पूर्णा येथे उपशिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांना भावपूर्ण निरोप
Next articleमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात 27 लघु उद्योग एकक कार्यान्वित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here