मोदी देशात सर्वात मोठे नौटंकीबाज- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

0
34

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क

 अकोला :देशात सर्वात मोठा नौटंकीबाज नरेंद्र मोदी आहे. असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 15 फेब्रुवारीरोजी अकोल्यात माध्यमांशी बोलताना केले. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नौटंकीबाज म्हटल्यानंतर त्याला जोरदार प्रत्युत्तर नाना पटोले यांनी यानिमित्ताने अकोल्यात माध्यमांशी बोलताना दिले आहे.
सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर निवासस्थानी आंदोलन करत व ते नंतर स्थगित केले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना नौटंकीबाज म्हणत हिणवले होते. त्यावर आज अकोला दौ-यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देत थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लक्ष करत त्यांच्यावर जहरी टिका केली. तर त्यांनी देशातील सर्वात मोठा नौटंकीबाज नरेंद्र मोदी असल्याचे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेसने या देशाची माफी मागितली पाहिजे. हे नाना पटोले वैगेर जे लोक आहे. हे नौटंकीबाज लोक आहे. त्याचा काही परिणाम होत नाही असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई येथे केला होता. त्यावर आज प्रत्युत्तर देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांना नरेंद्र मोदी यांना तर नौटंकीबाज म्हणायचे नव्हते असे उत्तरही नाना पटोले यांनी दिले आहे.

Advertisements
Previous articleजन अभियान फाउंडेशन ने केली निराधार बालकांची तपासणी
Next articleजलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनअंतर्गतच्या कामांना गती देवून मार्च पूर्वी कामे प्राधान्याने पूर्ण करावीत- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here