बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

0
76

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प
मुल्यसाखळी विकासासाठी शेतकरी कंपन्यांकडून अर्ज मागविले
अकोला : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यातील समुदाय आधारीत संस्थांकडून मूल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज शेतमाल, शेळ्या (मांस व दूध) परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मूल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पांच्या विकासासाठी आहेत. त्यासाठी समुदाय आधारीत संस्था जसे शेतकरी उत्पादक कंपनी, त्यांचे फेडरेशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोक संचालित साधन केंद्र पात्र असतील. यासंदर्भातील सर्व माहिती, अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष इ. https://www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट घ्यावी. माहिती भरावी व आवश्यक कागदपत्रे जोडून जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा यांच्या कार्यालयात तसेच लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी, माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने 31 मार्चपर्यंत सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही, असे प्रकल्प संचालक, पुणे यांनी कळविले आहे.

Advertisements
Previous articleपारंपारिक प्रथेला फाटा देत मुलींनी वडिलांना दिला मुखाग्नी
Next articleजिल्हयात मंगळवारी 17 कोरोना पॉझिटिव्ह, 53 जणांना डिस्चार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here