संत नरहरी महाराज सभामंडपाचे आ. रणधीर सावरकर यांचेहस्ते भूमिपूजन

0
190

● राज्यातील पत्रकारांचाही केला सन्मान

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्युज नेटवर्क 
अकोला :शहरातील मोठी उमरी गुडधी भागातील संत नरहरी महाराज मंदिरात संत नरहरी महाराज पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून आमदार रणधीर सावरकर यांचे हस्ते सभामंडपाचे भुमीपूजन करण्यात आले.
श्री. संत नरहरी महाराज सेवा समिती, अखिल माळवी सोनार समाज महासंघ अकोला, श्री. द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर व ऑल इंडिया सोनार फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील ठिकठिकाणीच्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी अकोला मनपाच्या महापौर सौ अर्चनाताई मसने ,माजी सभापती जयंतराव मसने यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी आमदार गोवर्धन शर्मा,शेगावचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्रदादा पाटील यांचेहस्ते श्री संत नरहरी महाराज ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. . यावेळी अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासाने,आॅल इंडिया सोनार फेडरेशन चे अध्यक्ष मोहनसेठ हिवरकर,द्वारकाधीश प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ अंजलीताई अनासाने,सहसचिव अनंतराव उंबरकर, संत नरहरी महाराज सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत हिरूळकर, अशोकदादा मुंडगावकर,अशोकराव हिरूळकर अकोट,अकोला सराफा असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे,श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुरेशराव अनासने,भारतीय सुवर्णकार समाज नागपूर चे कार्याध्यक्ष ओंकारेश्वर गुरव ,शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीरंगदादा पिंजरकर, सोनार महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टकोरे,माजी नगरसेवक संतोषराव अनासने, केशवराव तळोकर,अकोटचे नगरसेवक गजाननराव लोणकर, अनिल काटोले, प्रविण मांडळे,भारतीय सुवर्णकार समाजचे धनराज उज्जैनकर,श्री संत नरहरी महाराज सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीकृष्ण धरमकर आदी मान्यवरां ची प्रमुख उपस्थिती होती. तदनंतर महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या ‘पत्रकार बांधवांना मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने श्रीकांत पाचकवडे अकोला, भगवानराव शहाणे औरंगाबाद ,आत्माराम ढेकळे पुणे,राजेंद्र माळवे नाशिक,ललीतकुमार पांडे ठाणे, दिनेश येवले,विवेक डुमरे नागपूर,शरद कुलथे परभणी,गजानन ठोसर मलकापूर, गजानन ईटनारे अमरावती, संजय प्रांजळे नांदुरा, अनिल शिराळकर सोलापूर, प्रशांत उंबरकर उमाळी,अंकित करे कारंजा,नारायण दाभाडे, अनिल उंबरकर शेगाव आदी पत्रकारांचा समावेश होता. सुत्रसंचलन संदिप गुहे व अनिल उंबरकर यांनी केले. तर आभार अखिल माळवी सोनार महासंघाचे अध्यक्ष विलासराव अनासाने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “श्री संत नरहरी महाराज सेवा समिती”चे पदाधिकारी चंद्रकांत हिरुडकर(अध्यक्ष ) ,गोपालराव लोणकर (कार्याध्यक्ष),जयकृष्णराव माळोकर(उपाध्यक्ष),ओमप्रकाश मानेकर(उपाध्यक्ष),प्रमोद बुटे(कोषाध्यक्ष),अरविंद तळोकर(सचिव),रमेश प्रांजळे(सहसचिव),रमेश बानुबाकडे (सहसचिव),गजानन उज्जैनकर(सदस्य),पुरुषोत्तम चेडे(सदस्य),गजाननराव माळोकर(सदस्य), तपेश्वर शेरेकर (सदस्य),संजय बानुबाकडे(सदस्य) आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

● दोन विद्यार्थीनीना घेतले दत्तक : शैक्षणिक खर्च देणार
दरम्यान याच कार्यक्रमात संत नरहरी सेवा समिती व अखिल भारतीय माळवी सोनार महासंघाचे वतीने कु.कांचन सुरेश अनासाने अकोला हिला युपीएससी पुर्व परीक्षा तयारीसाठी पुस्तकांचा संच भेट दिला. तसेच आठव्या वर्गात शिकत असलेल्या कु.धनश्री अनिल उंबरकर हिच्या शिक्षणाचा खर्च दत्तक स्वरुपात द्वारकाधीश प्रतिष्ठान नागपूर अंतर्गत अध्यक्षा सौ.अंजलीताई अनासने यांनी करण्याचे जाहीर केले.
●आयुष्यमान कार्ड व ई-प्रकारचे निशुल्क वितरण
शासनाच्या योजनांचा लाभ समाज बांधवांना मिळवून देण्याचे दृष्टीने कार्यक्रम स्थळी आयुष्यमान कार्ड व ई-श्रमकार्ड चे निशुल्क वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा शेकडो सोनार समाजातील महिला व पुरुषांशी लाभ घेतला.
● रामनवमी नाम जप उपक्रमात महिलांचा सहभाग
श्री रामनवमी शोभायात्रा समिती अंतर्गत महिलाना राम नाम जप लिहिण्यासाठी वह्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात जवळपास हजार महिलांनी सहभाग घेतला.

Advertisements
Previous articleभारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे
Next articleनवाब मलिकांच्या अटकेचा अकोला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here