काजीखेड शेत शिवारात रंगल्या किसान गोष्टी…

0
123

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
  अकोला:बाळापुर तालुक्यातील मौजे काजीखेड येथे कृषी तंञज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) डॉ.कांतप्पा खोत,यांच्या मार्गदर्शनाखाली किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंचा सौ विजया परघरमोर,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. एम.डी.गिरी,कृषी विज्ञान केन्द्राचे डॉ. जी.जे.तुपकर,तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने आत्मा यंत्रणाचे व्हि एम शेगोकार मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.त्यानंतर कृषी विभागाच्या (आत्मा) यंत्रणाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि एम शेगोकार यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना किसान गोष्टी कार्यक्रमात शेतकरी गटनिर्मिती व पोकरा अंतगर्त राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, प्रधानमंत्री खाघ उन्नयन योजना, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तरपणे माहीती देण्यात आली. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषि विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ डॉ गजानन तुपकर यांनी कांदा पिक व्यवस्थापन, किड व रोग नियंत्रण,कांदा साठवणूक, विक्री आणि कांदा पिकाच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा टिप्स सांगीतल्या.त्यानंतर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ मिलिंद गिरी यांनी हरभरा पिकांचे व्यवस्थापन व उन्हाळी मुग लागवड व व्यवस्थापन या पिकाविषयी सविस्तरपणे माहिती देऊन शेतकऱ्यांनी विचाररेल्या प्रश्नाचे निरसन केले.सरते शेवटी तालुका कृषी अधिकारी नंदकिशोर माने यांनी कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देऊन सदर गाव पोकरा योजनेत असल्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पोकरा व महाडीबीटी अशा विविध योजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमाकरीता शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता मंडळ कृषी अधिकारी शिवाजी जाधव, कृषी सहाय्यक एस एन पातोंड,यु एम धुमाळे, समुह सहाय्यक सचीन तायडे, वैभव दांदळे,कृषीमित्र अभिमन्यु धुमाळे, जीवन परघरमोर व गावातील कांदा उत्पादक शेतकरी यांनी आयोजनाकरीता पुढाकार घेतला.

Advertisements
Previous articleडॉ आंबेडकर क्रीडांगणाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : आम. मिटकरी
Next article27 फेब्रुवारीरोजी लसीकरण करण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here