महाबीजमध्ये बोगस भरती, ११ अधिकारी – कर्मचा-यांवर बरखास्तीची कारवाई

0
381

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: जातीचे खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमधील नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचेविरुध्द महाबीजने कठोर कारवाई केली आहे. महाबीजच्या प्रशासनाने अशा प्रकारच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या एकुण 11 अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच्या आधारावर कठोर कारवाई केली आहे.  यामध्ये नागपुर येथिल जिल्हा व्यवस्थापक गणेश महादेव चिरुटकर, गडेगाव जि. भंडारा येथिल कनिष्ठ प्रशासन सहाय्यक भिमराव मारोतराव हेडाऊ,  शिवनी अकोला येथिल कनिष्ठ प्रशासन सहाय्यक एम. एन. गावंडे,  हिंगोली केंद्र व्यवस्थापक राजेंद्र जुनघरे, परभणी येथिल श्री घावट, जालना येथिल शिपाई अजापसिंग घुसिंगे यासह एकुण 11 कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे. दि. 03.01.2022 चे कार्यालयीन आदेशाद्वारे महाबीजने खोटे प्रमाणपत्र लावुन नोकरी बळकावणाऱ्या विरुध्द रितसर कारवाई करण्यात आली आहे.
महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेने केला घोटाळा उघड
बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नोकरी मिळवल्याची बाब महाबीज प्रशासनाला माहित झाल्यावर महाबीज प्रशासनाने अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची ठोस अथवा दंडात्मक कारवाई केली नव्हती. परंतु महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपुर यांचे निवेदन व मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे महाबीज प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले आहे.
त्यांच्याकडून पैसे वसूल करा: राजेश भगत 
बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल करणा-या अधिकारी व कर्मचा-याकडून व्याजासह पैसे वसूल करावे तसेच रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन पदभरती करून आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा अशी मागणी महाबीजचे माजी केंद्र अभियंता तथा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश भगत यांनी केली आहे.

Advertisements
Previous articleभाजपा विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदी अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर
Next articleजिल्हा परिषद योजना राबवण्यात अपयशी सात कोटींचा निधी पडून, महाविकास आघाडीचे धरणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here