देवेंद्र ठाकरे
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : माजी कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी, ९ मार्च रोजी साप्ताहिक ‘सातपुडा हेडलाईन्स’ च्या वतीने ‘भगीरथ’ विशेषांक प्रकाशित करण्यात आला.या विशेषांकाचे विमोचन जळगाव जामोद येथील प्रशस्त सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी ११ वाजता करण्यात आले. आमदार डॉ. संजय कुटे यांचे बंधू अॅड. प्रमोदजी कुटे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा सीमाताई डोबे, लताताई तायडे, माजी नगरसेवक कैलास डोबे, आमदार डॉ. संजय कुटे यांचे स्विय सहाय्यक निलेश शर्मा, बाळु कुटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाघ पाटील, भाजपा शहराध्यक्ष अभिमन्यु भगत, भाजयुमो तालुकाध्यक्ष परिक्षित ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते तुषार टापरे, बंडु ठाकरे, अनंता कराळे, भाजपा नेते दिलीप राठी, खामगाव येथील जेष्ठ पत्रकार बळीराम वानखडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र चोखट, राध्येशाम जाधव यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.
आमदार डॉ. संजय कुटे यांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघामध्ये ‘पाणी’ या विषयाला घेवून मोठी कामे केली आहेत. १४० गाव पाणी पुरवठा योजना, चोंढी येथील सिंचन प्रकल्प, जिगाव प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाचा प्रश्न आदी कामांचा आढावा ‘भगीरथ’ विशेषांकात घेण्यात आला. सोबतच स्व. श्रीरामजी कुटे गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रूग्णसेवेचाही समावेश या अंकात करण्यात आला.
आमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित ‘भगीरथ’ विशेषांकाचे विमोचन
Advertisements