13 महिन्याच्या मुलीची हत्या! आईचा आत्महत्येचा प्रयत्न

0
47

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: आपल्या १३ महिन्याच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या करून आईने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २१ मार्चच्या रात्री बाभूळगाव येथे घडली. घरातील इतर व्यक्तींच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सदर महिलेस अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणा-या बाभूळगाव येथील प्रियंका बोबडे या महिलेने सोमवारी रात्री आपल्या १३ महिन्याच्या मुलीची गळा दाबून आधी हत्या केली. त्यानंतर तीने स्वत:च्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना घरातील इतर व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. या महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीच्या तक्रारीवरून महिलेविरूद्ध गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Advertisements
Previous articleकुटासा येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीला प्रारंभ ! अकोला पूर्व मध्ये बैलगाड्यांची भिर्रर्
Next articleअकोला पंचायत समितीची आमसभा व सरपंच शिबीर उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here