नियमित उपचाराने नियंत्रणात राहतो दमा.. दमा तज्ज्ञ डॉ. संजय भारती यांची माहिती

0
59

मंगेश फरपट 
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: कमी निदान आणि उपचारांचे पालन न करणे हे भारतातील वाढत्या अस्थमाचे प्रमुख कारण आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज च्या अभ्यासाने असा अंदाज लावला आहे की, भारतात ३० दशलक्षाहून अधिक दम्याचे रूग्ण आहे, जे जागतिक भाराच्या १३.०९% आहेत. म्हणून या विकाराचा उपचार होने ही काळाची गरज असून योग्य निदान व उपचाराने हा रोग नियंत्रणात राहू शकतो. अशी माहिती अकोला येथील दमा तज्ञ डॉ संजय भारती यांनी दिली.
३ मे रोजी जागतिक दमा दिन आहे. त्यानिमित्त आज सोमवार, २ मे रोजी जागतिक दमा दिनाच्या पुर्वसंध्येला अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. संजय भारती यांनी या रोगाची शास्त्रीय माहिती दिली. या रोगात मृत्यूदराचा विचार केल्यास, सर्व जागतिक अस्थमा मृत्यूपैकी ४२% पेक्षा जास्त भारताचा वाटा आहे. विकृती आणि मृत्यूचे प्रमुख कारण असूनही, हा आजार वर्षानुवर्षे निदान होत नाही आणि त्यावर उपचार केला जात नाही. जागतिक स्तरावर केलेल्या लोकसंख्येवर आधारित अभ्यासांनी असा अंदाज लावला आहे की, दम्याचे २०% ते ७०% रुग्ण निदान झालेले नाहीत आणि त्यामूळे उपचार केले जात नाहीत. अस्थमाचे कमी निदान आणि उपचार न करण्याच्या विविध कारणांमध्ये रोग जागरूकता नसणे, इनहेलेशन थेरपीचे खराब पालन निरक्षरता, गरिबी आणि सामाजिक कलंक यांचा समावेश होतो. रुग्ण अनेकदा त्यांच्या सुरुवातीच्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात जे त्यांना अधिक गंभीर स्थितीत आणतात. ग्लोबल अस्थमा नेटवर्क (जीएएन) च्या अभ्यासानुसार सुरुवातीची लक्षणे असलेल्या रुग्णापैकी ८२% आणि गंभीर दमा असलेल्या रुग्णांपैकी ७०% रुग्णांचे भारतात निदान झालेले नाही. दैनंदिन इनहेलेशन थेरपीचा वापर करणारे २.५% पेक्षा कमी रूग्ण निदान झालेल्या रुग्णांमध्ये इष्टतम उपचारांचे पालन कण्याची टक्केवारी देखील खूप कमी आहे.दमा, ज्याला सामान्य लोक सहसा ‘स्वास’, ‘दमा’ किंवा ‘सर्दी आणि खोकला’ म्हणतात, हा एक तीव्र श्वसन रोग आहे ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते, छातीत दुखते, खोकला आणि घरघर होते. हा रोग फुफ्फुसांचा वायुमार्गावर परिणाम करतो, ज्यामुळे दीर्घकाळ जळजळ होते, ज्यामुळे वायुमार्ग अधिक संवेदनशील बनतो ज्यामूळे दम्याचा झटका येण्याची शक्यता वाढते. जीएएन अभ्यासाचा दाखला देत डॉ. संजय भारती यांनी अस्थमा बदलच्या सामाजिक कलंकाला संबोधीत करण्याच्या महत्वावर भर दिला.
“जेव्हा अस्थमाचा रूग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतो, तेव्हा फक्त ७१% डॉक्टर त्यांच्या आजाराचे नांव म्हणून “दमा” चे निदान करतात तर एक तृतीयांश (२९%) इतर संज्ञा वापरतात. तसेच रुग्णाच्या पातळीवर केवळ २३% दम्याचे रूग्ण त्यांच्या आजाराला दमा म्हणतात. अस्थमा आणि इनहेलरच्या वापराशी संबंधीत सामाजिक कलंक प्रचलित आहे. पुढे, रूग्ण क्चवितच औषधांचे पालन करतात आणि मुख्यतः लक्षणांवर आधारित उपचार घेतात. दम्या विरूध्द विजय मिळविण्यासाठी जागरूकता,स्वीकृती आणि पालन करणे आवश्यक आहे.डॉ. संजय भारती यांनी ठळकपणे सांगितले, “दमा हा कलंक मानला जातो आणि बरेच रुग्ण हा आजार लपवतात. जेव्हा लक्ष्णे वाढतात किंवा असहय होतात तेव्हाच रूग्ण डॉक्टरांचा सल्ला घेतो आणि लिहून दिलेली औषधे घेतो आम्ही रूग्णांना आठवण करून देत राहणे आवश्यक आहे की लक्षणे मुक्त दमा मुक्त नाही.अस्थमा व्यवस्थापनातील हे सर्वात मोठे आवाहन आहे.
बरे वाटल्यावर अनेक रुग्ण इनहेलर वापरणे बंद करतात हे बंद केल्याने अनेकदा लक्षणे भडकतात ज्यामूळे रोगाचे परिणाम बिघडु शकतात. पुढे, इनहेलर्स हानीकारक असणे आणि सवय लागणे यासारख्या चुकीच्या कल्पना देखील उपचार न पाळण्यात भुमिका बजावतात. त्यामुळे याकडे आक्रमकपणे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांसाठी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे ही काळाची गरज आहे, ज्यामूळे त्याला त्याच्या लक्षणांबदल योग्य माहिती आणि निदान मिळण्यास मदत होईल आणि योग्य उपचार लवकर सुरू करता येतील. दम्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर निदान करणे फार महत्वाचे आहे. तुमच्या दम्याची लक्षणे समजून घ्या आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही डॉ संजय भारती यांनी केले आहे.
————-

Advertisements
Previous articleजगाला निरामय करण्यासाठी होमिओपॅथी काळाची गरज : होमिओपॅथी तज्ज्ञ डाॅ. संदिप चव्हाण
Next articleपर्यटनासाठी गेलेल्या अकोल्याच्या दोन युवकांचा तेलंगणातील बासर येथे नदीत बुडून मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here