अग्नीविर योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर

0
50

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अग्निपथ योजनेमागे भाजपा व आरएसएसचा गुप्त अजेंडा : अॅड. प्रकाश आंबेडकर
अकोला: केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहिर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनाचे लोण देशातील १५ राज्यात पोहचले आहे. आज तिस-या दिवशीही देशात विविध ठिकाणी जाळपोळीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे तर कित्येक जखमी झाले आहेत. देशातील जनतेच्या जीवावर केंद्र सरकार उठले असून अग्निपथ योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल, असा प्लान भाजपा व आरएसएसचा आहे. अशी खळबळजनक टिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. अग्निपथ योजनेला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध असल्याचेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisements
Previous articleदिर्घ काळानंतर अकोल्यात ‘दोन’ पॉझिटीव्ह, प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
Next articleदामिनी’ app चा वापर करा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here