वर्हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी अकोला मनपाच्या वतीने युडीआयडी प्रमाणपत्र व ओळखपत्र काढण्याकरिता 30 जुन 2022 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. शासनाकडून दिव्यांगासाठी विविध योजना राबविल्या जाते.
शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व दिव्यांग ओळखीसाठी युडीआयडी अर्थात वैयक्तिक प्रमाणपत्र व ओळखपत्र याची दिव्यांग व्यक्तींना गरज भासत असते. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुध्दा हे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपयोगात येते. मात्र या युडीआयडी प्रमाणपत्रा संदर्भात दिव्यांगांना माहिती नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्ती शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत राहतात. ही बाब लक्षात घेवून दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांच्या सुचनेनुसार दिव्यांग व्यक्तींसाठी या विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या दिव्यांग व्यक्तींनी अद्याप पर्यंत युडीआयडी कार्ड काढलेले नाही किंवा ज्यांचेकडे दिव्यांगत्वाचे अन्य विभागाचे प्रमाणपत्र आहे, अशा सर्व दिव्यांगांनी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील वार्ड क्रमांक 106 मधील हेल्प डेस्कची मदत घेउन तपासणी करून युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र नोंदणी करून घ्यावी. युडीआयडी कार्ड नोंदणी करिता दिव्यांग व्यक्तींनी आपले आधार कार्डची झेरॉक्स प्रत, पासपोर्ट फोटो, जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र असल्यास त्याची प्रत घेउन हेल्प डेस्कच्या मदतीने 30 जून 2022 पुर्वी सुरू असलेल्या विशेष मोहीमेचा लाभ घेउन युडीआयडी कार्ड व प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
दिव्यांग युडीआयडी प्रमाणपत्र, ओळखपत्रासाठी विशेष मोहीम मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांची माहिती
Advertisements