बुलडाणा जिल्ह्यात आज 143 पॉझिटिव्ह

0
155

334 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह; 153 रूग्णांना मिळाली सुट्टी
बुलडाणा: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 477 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 334 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 143 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 133 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 224 तर रॅपिड टेस्टमधील 110 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 334 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : खामगांव शहर : 19, खामगांव तालुका : बोरजवळा 9, गवंढळा 1, घाटपुरी 1, जनुना 1, शिरसगांव 1, शेगांव शहर : 18, शेगांव तालुका : जवळा 2, सवर्णा 2, मोताळा तालुका : जहांगीरपूर 2, घुस्सर 5, पिंपळपाटी 1, आव्हा 1, मोताळा शहर : 4, नांदुरा शहर : 12, नांदुरा तालुका : माटोडा 1, मलकापूर शहर : 7, मलकापूर तालुका : देवधाबा 1, चिखली शहर : 12, चिखली तालुका : पेठ 1, करतवाडी 1, संग्रामपूर शहर : 2, संग्रामपूर तालुका : टुनकी 1, वरवट बकाल 2, लोणार तालुका : पांग्रा डोळे 17, वढव 1, लोणार शहर : 4, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 6, ताडशिवणी 1, तडेगांव 1, दे. राजा शहर : 1, बुलडाणा शहर : 3, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 1, मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 143 रूग्ण आढळले आहे.त्याचप्रमाणे उपचारा दरम्यान साखरखेर्डा ता. सिं. राजा येथील 45 वर्षीय पुरूष व मूळ पत्ता फर्दापूर ता. सोयगांव जि. औरंगाबाद येथील 75 वर्षीय पुरूष रूग्णाचा बुलडाणा स्त्री रूग्णालयात मृत्यू झाला आहे.
तसेच आज 153 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.
कोविड केअर सेंटरनुसार आज सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : शेगांव : 19, खामगांव : 44, मलकापूर : 1 , नांदुरा : 15, दे. राजा : 27, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 35, चिखली : 8, लोणार : 3, मेहकर : 1, तसेच आजपर्यंत 29786 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 5820 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 5820 आहे.
आज रोजी 984 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 29786 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6997 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 5820 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 1089 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 88 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleनांदुरा येथे 17 कोरोना पॉझिटिव्ह
Next articleविद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here