राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर सचिव शेख हकीम रेडीमेडवाला यांची
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे मागणी
अकोट फल पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था चोख ठेवली आहे. याशिवाय गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांवर एमपीडीए, तडीपार अशी कारवाई करून गुन्हेगारी कारवायांना आळा बसला आहे. याशिवाय त्यांच्या कार्यकाळात दोन समाजात दंगलीसारख्या घटना घडू नयेत, दोन्ही समाजातील नागरिकांच्या नियमित बैठका घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या. अशा सक्षम अधिकाऱ्याच्या बदलीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांचे मनोबल वाढेल. त्यामुळे पोलीस निरीक्षकाची बदली करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर सचिव शेख हकीम रेडीमेडवाला यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.
पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांची बदली करू नका
Advertisements