३ वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर फांदी पडल्याने मृत्यू

0
83

संग्रामपूर: तालुक्यातील चांगेफळ येथे ३ वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर चिंचेच्या झाडाची फांदी पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. गावाशेजारी असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ काही मुले खेळत होती. दरम्यान फांदी अंगावर पडल्याने त्याठिकाणी खेळत असलेल्या भावेश सुभाष साबे वय ३ वर्ष याचा जागेवरच मृत्यू झाला. तर आणखी एक मुलगा जखमी झाला आहे. तर दोन दिवसापूर्वी लोणार तालुक्यातील रायगावजवळ दुचाकी अपघातात मालवाहूने धडक दिल्याने कार्तीक धोत्रे  वय ३ वर्ष रा. गोत्रा ता. लोणार हा ठार झाल्याची घटना घडली होती. जिल्ह्यात तीन दिवसात दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here