अकोला जिल्ह्यात कलम 36 अन्वये स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान: एसपी जी.श्रीधर

0
30

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जिल्ह्यात ऑगस्ट महिण्यात दि. 18 रोजी गोकुळाष्टमी, दि. 19 रोजी दहीहांडी व गोगानवमी, दि. 22 रोजी कावड-पालखी उत्सव मिरवणूक, दि. 26 रोजी पोळा व दि. 27 रोजी पोळ्याची कर व दि. 31 रोजी श्री गणेश स्थापना उत्सव साजरे करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये जिल्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक व त्यांचे पेक्षावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि. 17 ऑगस्टचे रात्री 00.01 वाजेपासून ते दि. 31 ऑगस्टचे रात्री 12 वाजेपर्यत जादा अधिकार प्रदान केले आहेत.
यात रस्त्यावरुन जाणाच्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक अशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी या विषयी निर्देश देणे. मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवून न देणे. अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा त्या मार्गाने जावू नयेत ते विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नद्यांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धूण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा लोकांच्या जाण्या-येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्यावे किंवा गाण्याचे किंवा ढोल, ताश, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे इत्यादी बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथीगृहाच्या) जागेत ध्वनीक्षेपकाचा(लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांचे कलम 33,36,37 ते 40,42,43 व 45 अन्वये कलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पूष्टी देणारे योग्य आदेश देणे इ. अधिकारांचा समावेश आहे. या आदेशाचे कोणीही, कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास पोलीस आधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आदेशात नमूद केले आहे.

Advertisements
Previous articleअजितदादा नावाचे शिस्तप्रिय विद्यापीठ…
Next articleरस्ते सुरक्षाः स्वतःचे व इतरांच्याही भल्यासाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here