अकोटच्या धान्य व्यापा-याला मागितली 5 लाखाची खंडणी; आरोपी 2 तासात अटक

0
216

सारंग कराळे
व-हाड दूत न्यूज नेटवर्क

अकोट जि. अकोला: शहरातील एका धान्य व्यापाऱ्याला जिवे मारायची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागणा-या आरोपीस अकोट पोलिसांनी अगदी २ तासात शिताफीने पकडण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई आज दि. 26 जुलैरोजी अकोट उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर  यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे व अकोट ग्रामीण पो.स्टे.चे ठाणेदार नितीन देशमुख व सहकारी पोलीस कर्मचा-यांनी केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका धान्य व्यापा-यास पाच लाख रुपयाची खंडणी मागून न  दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबतची तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी रितू खोखर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या दोन तासाच्या आत खंडणीखोराला एमआयडीसी परिसरातून अटक केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध अपराध क्र. 385/22, IPC क. 386, 387, 507 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर घटनेची सविस्तर माहिती देण्यासाठी उद्या दि. 27 जुलैरोजी सकाळी 11.30 वाजता अकोट शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरिक्षक प्रकाश अहिरे यांनी दिली आहे.

Advertisements
Previous articleतडीपार आरोपीस विशेष पथकाकडून अटक
Next article13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाच वर्षाची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here