13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाच वर्षाची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

0
37

व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: बिस्किट देतो असं आमिष देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका ५४ वर्षीय आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. हा निकाल अकोला जिल्हा व सत्र न्यायाधीश (पहिले) शयना पाटील यांच्या न्यायालयाने आज बुधवारी दिला.
समाधान उदेभान तायडे (वय ५४, रा. सांझापूर) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने १३ ऑगस्ट २०१९ रोजी पीडितेला त्याच्या घरी बिस्किट देतो असे आमिष देऊन बोलावले होते. त्यानुसार पीडिता त्याच्या घरी गेली होती. त्यानंतर त्याने अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, विनयभंग केला व कुणाला काही सांगितल्यास शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली होती. मुलीने ही बाब घरी सांगितल्यानंतर मुलीच्या आईने मुर्तिजापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी समाधान उदेभान तायडे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३४२,३५४ व ७,८,११,१२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास तत्कालिन पोलिस अधिकारी स्वाती इथापे व संदीप मडावी यांनी केला व आरोपीविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. विशेष म्हणजे पीडिता ही वैद्यकीय कारणास्तव साक्ष देऊ शकली नाही. इतर साक्षीपुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी समाधान उदेभान तायडे याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. अतिरिक्त सरकारी वकिल राजेश आकोटकर यांनी बाजू मांडली. तसेच पैरवी अधिकारी म्हणून एसएसआय काझी व नापोकॉ. नारायण शिंदे यांनी सहकार्य केले.

Advertisements
Previous articleअकोटच्या धान्य व्यापा-याला मागितली 5 लाखाची खंडणी; आरोपी 2 तासात अटक
Next article24 गावे होणार हर घर जल घोषीत- सौरभ कटियार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here