24 गावे होणार हर घर जल घोषीत- सौरभ कटियार

0
75

* जल जिवन मिशन अंतर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची कामे पुर्णत्वास
* दररोज दरडोई 55 लिटर पिण्याचे पाणी होतेय उपलब्ध

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत हर घर नल से जल उत्सव मोहीम राबविण्यात येत आहे. शंभर टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळजोडणी पूर्ण करणाऱ्या 24 गावे हर घर जल घोषीत करण्यात येणार आहे. विशेष मोहीमेमध्ये 12 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या मोहिमे मध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
या मोहिमेदरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळजोडणीचे उद्दीष्ट पुर्ण झालेल्या गावाची हर घर जल घोषीत करुन नळजोडणी पुर्ण झाल्याचे गावाचे प्रमाणपत्र, विशेष सभेचे छायाचित्रिकरण, ग्रामस्थांची मुलाखतीचा 2-3 मिनिटांची मुलाखत व फोटो केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावयाची आहे.
विशेष ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत हर घर जल घोषित करण्याबाबत ठराव घेणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी एफटीके (FIELD TEST KIT) च्या माध्यमातून विशेष मोहीम राबविणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र या मधील सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तर ग्रामपंचायत शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, व ईतर शासकिय सार्वजनिक ठिकाणी नळजोडणी या दरम्यान देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक राजीव फडके, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग संजय कावळे यांनी केले आहे.

Advertisements
Previous article13 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पाच वर्षाची शिक्षा; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
Next articleविनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षांची शिक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here