ऑटोचालकाचा प्रामाणिकपणा, दिड लाखाचा मोबाईल दिला परत

0
251
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: कौलखेड रोडवरील आरोग्य नगरच्या बोर्डजवळील रस्त्यावर सापडलेला दिड लाखाचा मोबाईल परत करून शेख इरफान उर्फ पठाण रा. मुल्लानी चौक खदान अकोला या ऑटोचालकाने आपल्या प्रामाणिकपणाचा परिचय दिला आहे.
सदर मोबाईल हा आझाद कॉलनीतील रहिवाशी अब्दुल हकीम देशमुख यांचा होता. ते परदेशात सायंटिस्ट म्हणून काम करतात. खदान पोलिस ठाण्याचे एपीआय प्रमोद सोनवणे यांच्या हातून हा मोबाईल अब्दुल हकिम देशमुख यांना परत देण्यात आला. यावेळी पोहेकॉ मो. फारुक अ.कदीर यांच्यासह भगतसिंग चौकातील एकता ऑटो युनियनचे अध्यक्ष शाकिर खान, शेख इरफान उर्फ पठाण, जावेद शेख, फिरोज खान, मो.मुस्तकीम, गजानन नेवाल, राजू खंडारे, सिद्धार्थ खंडारे, अब्दुल रहेमान, वाहिद कुरेशी आदी उपस्थित होते.
Advertisements
Previous articleविनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरला दोन वर्षांची शिक्षा
Next articleसरपंचपती एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here