युवकाने केले युवतीसोबतचे व्हिडीआे व्हायरल; २३ वर्षाच्या युवकाने केलं भयानक कृत्य
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: प्रेमप्रकरण कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. या घटनेत गर्लफ्रेंडला वारंवार लॉजवर बोलावून अत्याचार करणाऱ्या अकोल्यातील एका युवकाला चांगलचं महागात पडलं आहे. युवकाने नकार देणा-या युवतीचे व्हिडीआे व्हायरल करीत तिची बदनामी केल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी युवकास अकोल्यातून आज दि. ५ ऑगस्टरोजी अटक केली आहे. प्रतिक गजानन मानकर (वय २३, राहणार वाडेगाव, ता. बाळापुर, जि. अकोला) असं आरोपी युवकाचे नाव आहे.
या युवकाचे अकोल्यातील एका युवतीसोबत प्रेमसंबध होते. त्याने तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेवून शेगाव येथे नेले.तिच्यासोबत शारिरिक संबध प्रस्थापित केले. मात्र युवतीला तो आपली फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच तिने त्याला नकार दिला. तेव्हा त्याने तिच्यासोबतचे व्हिडीआे व्हायरल केले. यानंतर तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर शेगाव पोलिसांनी युवकाचा शोध घेवून त्याच्यावर विविध कलमान्वय्े गुन्हे दाखल करून अकोल्यातून आज दि. ५ ऑगस्टरोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केली आहे.
गर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार
Advertisements