खुल्या मिठाई विक्रीवर ‘बेस्ट बिफोर’ तारीख अनिवार्य

0
129

बुलडाणा: स्वीटमार्ट व रेस्टॉरेंट मध्ये विविध प्रकारची मिठाई तयार करून विक्री करण्यात येत असते. ही मिठाई तयार करण्याकरीता मोठ्या प्रमाणात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा वापर करण्यात येत असतो. त्यामुळे काही कालावधी नंतर त्याचा दर्जा कमी होतो. परिणामी सदर मिठाई किती दिवसापर्यंत खाण्यायोग्य आहे हे ग्राहकांना कळू शकत नाही. मात्र पॅकिंग मिठाईवर उत्पादनाची तारिख व खाण्यायोग्य तारीख नमूद असते. ती खुल्या स्वरूपात विक्री होणाऱ्या मिठाईवर नमूद नसते. तरी 1 ऑक्टोंबर पासून खुल्या स्वरूपात विकल्या जाणाऱ्या मिठाईच्या ट्रे किंवा कंटेनरवर ‘बेस्ट बिफोर’ किंवा खाण्यास योग्य तारीख टाकणे अनिवार्य आहे. हा नियम लागू करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा व मानदे प्राधीकरण, नवी दिल्ली यांनी 25 सप्टेंबर 2020 रोजी याबाबत निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अन्न व्यावसायिक स्वेच्छेने उत्पादनाची तारिख अर्थात डेट ऑफ मॅन्युफॅक्चरींग मिठाई ठेवलेल्या ट्रे, कंटेनरवर टाकू शकतात. तरी जिल्ह्यातील सर्व स्वीट मार्ट, रेस्टॉरेंट व इतर मिठाई विक्रेत्यांनी विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात येणाऱ्या मिठाईच्या ट्रे, कंटेनरवर बेस्ट बिफोर तारीख टाकावी. जेणेकरून ग्राहकांना चांगल्या दर्जाची मिठाई उपलब्ध होईल. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक आयुक्त (अन्न) स.द केदारे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here