मानव पॉलिटेक्निक कॉलेजच्या एका विद्यार्थीनीसह 3 विद्यार्थी बेपत्ता

0
202

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: एकाच महाविद्यालयात शिकणारे तीन तरुण आणि एक तरुणी मागील १ ऑगस्टपासून बेपत्ता आहे. १ ऑगस्टला चौघेही घरून कॉलेजला गेले. मात्र तेव्हापासून ते परतलेच नाहीत. चौघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या व्याळा येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिकत आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील तिघांचा तर बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील तरुणाचा समावेश आहे. तुळशी अनिल ताले (वय १८, राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय २१ रा. अडगाव बु. ता. तेल्हारा, जि. अकोला) आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) बेपत्ता असल्याची तक्रार बाळापूर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल आहे. हे चौघेही बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव सिटी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. चार विद्यार्थी सोमवारी कॉलेजमध्ये गेले होते. मात्र अद्याप ते घरी परतलेच नाही. हे चौघेही कुठे दिसून आल्यास तात्काळ अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. ७०२०८२१७८५ आणि ९८५०५२८८८५ या मोबाईल क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisements
Previous articleमोठी उमरीतील युवकाने मारली पुर्णा नदीपात्रात उडी
Next articleविशेष पोलिस पथकाचा क्रिकेट सट्यावर छापा; आरोपीसह १ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here