सीईटी परीक्षेकरिता एसटी सोडणार विशेष बस

0
118

विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
बुलडाणा: राज्यात 1 ऑक्टोंबर ते 9 ऑक्टोंबर 2020 या कालावधीत सीईटी परीक्षेचे आयोजित करण्यात आलेले आहे. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थी बसणार आहे. त्यासाठी एस. टीच्या बुलडाणा विभागाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 30 सप्टेंबर व 10 ऑक्टोंबर या तारखेस विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारने कोविड संसर्ग सुरक्षेसाठी घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार प्रवास करता येणार आहे. बस प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या उमेदवारांचा गट तयार असल्यास त्यांचे जाणे-येणेसाठी आगाऊ रक्कम भरून बसेस पुरविण्यात येणार आहे. याकरीता संबंधीत आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. या संधीचा परीक्षार्थी उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक व विभागीय वाहतूक अधिकारी यांनी केले आहे.

संपर्कासाठी आगारांचे संपर्क क्रमांक …. 

बुलडाणा अगार : 07262-242392, चिखली आगार : 07264- 242099, खामगांव आगार : 07263- 252225, मेहकर आगार : 07268- 224544, मलकापूर आगार : 07267-222165, जळगांव जामोद आगार : 07266- 221502, शेगांव आगार : 07265-254173.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here