ताम्हीणी घाटात कार कोसळली; वाशिमचे तिघे ठार, तिन गंभीर

0
71

मृतक रिसाेड तालक्यातील युवक
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
वाशीम : पुणे माणगांव दरम्यानच्या ताम्हीणी घाटात शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सूमारार पूण्याहून माणगाव कडे येणारी मारुती स्विफ्ट डिझायर कार घाटातील कोंडेथर येथील वळणावरुन थेट 400 मिटर खोल दरीत कोसळून खालच्या रस्त्यावर आदळून भिषण अपघात झाला. अपघातगस्त कार मध्ये एकूण सहा जण होते, त्यातील तिघे जागीच ठार झाले आहेत. तर तिघा जखमींना वाचवण्यात रेस्कू टिम्स व पोलीसांना यश आले आहे.
हे सर्व प्रवासी वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांतील असून ते शनिवारी पुण्याहून ताम्हीणी घाट मार्गे कोकणात मामगांवकडे येत असताना कोंडेथर येथील एक अवघड वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सूटून कार थेट कड्यावरुन 400 मिटर खाली असलेल्या घाटातील रस्त्याच्या बाजूच्या नाल्यातच कोसळली असल्याची माहिती अपघातानंतर तत्काळ बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या साळूंखे रेस्क्यू टिमचे प्रमुख प्रशांत साळूंखे यांनी दिली. दरम्यान महाड येथील सिस्केप रेस्क्यू टिम ,स्थानिक ग्रामस्थ आणि रायगड पोलीस सद्यस्थितीत संयूक्तरित्या बचाव कार्य करित असल्याचे साळूंखे यांनी सांगीतले. अपघातग्रस्त कारमध्ये एक प्रवासी अद्याप अडकलेला असून त्याला काढण्याचे काम सुरु आहे. अपघातानंतर बचावलेले तिघेही पुर्णपणे घाबरले असून त्यांना बोलणेही अवघड झाले असल्याने त्याच्या बाबतची माहिती मिळण्यात अडचण येत आहे. मात्र स्थानिक माणगांव पोलीस त्यांना धिर देऊन त्यांच्या बाबतची माहिती घेत असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक अतूल झेंडे यांनी दिली.

ऋषभ, सौरभ व क्रिष्णाचा मृत्यू 
कारमध्ये मयत झालेले ३ प्रवासी व जखमी ३ प्रवासी अडकून पडले होते त्यांना पोलिसांनी,साळुंखे रेस्क्यू टिमनी बाहेर काढले. मयतांना व जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या अपघातात ऋषभ चव्हाण, सौरभ भिंगे,क्रष्णा राठोड यांचा जागीच म्रुत्यु झाला.तर रोहन गाडे,प्रवीण सरकटे, रोशन चव्हाण हे ३ जण जखमी झाले.जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Advertisements
Previous articleमिटकरी साहेब, तोंडाला येईल ते बडबडू नका : अक्षय जोशी
Next articleशिवसेना – भाजपची जुनीच मैत्री : खा.डॉ.श्रीकांत शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here