सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेचा लाभ घ्यावा – शशीकिरण जांभरुणकर

0
141

अकोल्यात शेतकरी -कर्मचारी कार्यशाळा उत्साहात
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांचे तसेच शेतकरी उत्पादक गटांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेचा लाभ शेतक-यानी घ्यावा, असे आवाहन अकोल्याचे तालुका कृषि अधिकारी शशिकिरण जांभरूणकर यांनी केले.
स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गायवाडा सभागृहात मंगळवार दि.23 ऑगस्ट रोजी शेतकरी कर्मचारी यांच्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. कांताप्पा खोत तर मार्गदर्शक म्हणून माविम च्या सोनाली अंबरते, नोडल अधिकारी ज्योती चोरे, अनिल शेरेवार, तालुका व्यवस्थापक, MSRLM, अकोला सिन्हा, जिल्हा व्यवस्थापक, अग्रणी बँक अकोला पवनकुमार काबरा, जिल्हा संसाधन व्यक्ती, अकोला
शेतकरी प्रतिनिधि विठ्ठल चतरकर, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, गजानन महल्ले, चंद्रकांत नावकार आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना जांभरुणकर म्हणाले, सन 2020-21 ते 2025 पर्यन्त या योजनेचा कालावधि असून 35% ते 50% अनुदान मिळणार आहे. योजनेत कृषिमाल अन्न धान्य, कड़धान्य, तेलबिया, मसाले, मासप्रकिया, कुकुटपालन, मत्स्यव्यवसाय, दुग्धव्यवसाय, किरकोळ वन उत्पादने या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट यांची पतमर्यादा वाढविन्यासाठी सदर योजना वरदान ठरत असून कच्चा मालावर प्रकिया करून वैयक्तिक शेतकरी/ शेतकरी गटाना भक्कम आधार देण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे. योजनेच्या जिल्हा नोडल अधिकारी चोरे मैडम यानी सांगितले की महिला शेतकरी उत्पादक बचत गटानी शेवया,क़ुर्ड्या, पापड, यांच्या पुढे जाऊन इतर खाद्य पदार्थ तैयार करावेत आणि शेतकरी गटाना सक्षम बनवावे. अग्रणी बैंकेचे सिन्हा यानी या योजनेतून शेतक-याना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शेरेवार, पवन काबरा, शेतकरी प्रतिनिधि विठ्ठल चतरकर यानी सुधा उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण-कार्यशाळेचे सूत्रसंचालन मंडल अधिकारी प्रदीप राउत यानी, प्रास्तविक शशिकिरण जाम्भरुनकर यानी तर कृषिसहायक परळकर यानी आभार व्यक्त केले. सदर कार्यशाळेला अकोला तालुक्यातिल बहुसंख्य गावातील शेतकरी गटांचे प्रतिनिधि, बचत गट प्रतिनिधि, शेतकरी उत्पादक प्रतिनिधि, कृषि विभागातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

Advertisements
Previous articleशिवसेना – भाजपची जुनीच मैत्री : खा.डॉ.श्रीकांत शिंदे
Next article“माझी शेती माझा सातबारा, मीच लिहीणार माझा पीकपेरा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here