रक्ताचे नाते जपा ! बुलडाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा!

0
269

प्रशांत खंडारे |
वऱ्हाड न्युज नेटवर्क
बुलडाणा
: कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे सप्टेंबर महिन्यात रक्तदान करणाऱ्यांची संख्या आटली असून रक्तदाते फिरकत नसल्याने जिल्ह्यातील बुलडाणा, शेगाव, खामगाव येथील शासकीय रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. जवळपास ७० टक्के रक्त संकलन कमी होत असून रक्तदानासाठी दात्यांनी रक्ताचे नाते जपून इतरांचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन रक्त करण्यात येत आहे.
दरवर्षी जून ते ऑगस्ट या काळात कॉलेजेस व राजकीय- सामाजिक कार्यक्रमात  मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे होतात. त्यामुळे रक्ताच्या पिशव्यांचे मोठ्या प्रमाणावर संकलन होते. परंतु, यंदा कॉलेजेस बंद असून त्यामुळे शिबिरे घेता येऊ शकलेली नाहीत. अनलॉकमध्ये सोशल डिस्टसिंग पाळून काही कार्यक्रम सुरू असले तरी रक्तदान शिबिरे अत्यल्प प्रमाणात होत आहेत. पूर्वीसारखे सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने विविध सामाजिक संस्थांकडून होणारे उपक्रमही यंदा होऊ शकलेले नाहीत. त्याचा रक्त संकलनावर विपरित परिणाम झाला आहे. कर्करोगाचे रुग्ण, प्रसूती, सिकलसेल, थालसेमिया, अॅनिमिया यांसारख्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते. सध्या कोरोना संसर्गाने जिल्ह्यात थैमान घातले आहे. दिवसागणीक कोरोनारुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी जिल्हयाची स्थिती बिकट करून ठेवली आहे. आता पर्यंत रुग्ण संख्या ७ हजारापार गेली तर ८६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ऑक्सीजन सिलिंडरचा,कोविड सेंटर मधील बेड, औषध साठ्याचा तूटवडा लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री दक्ष आहेत. दरम्यान  या कोरोनाच्या संकटकाळात रक्ताचा देखील तुटवडा भासू लागला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हयातील बदली होवून गेलेले जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ हा उपक्रम ऑगस्ट महिन्यात सूत्य ठरला. या उपक्रमांतर्गत पोलिस कर्मचारी, गणेश मंडळाच्या सदस्यांनी व नागरीकांनी रक्तदानाचे दायीत्व निभावले. मात्र हा उपक्रम सध्या थंड पडला असून सप्टेंबर महिन्यात रक्ताचा तूटवडा निर्माण झाला आहे. बुलडाणा सारखीच शेगाव, खामगाव येथील शासकीय रुग्णालयाची स्थिती असल्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्याची गरज अत्यावश्यक ठरत आहे.

  • जिल्हा रुग्णालयात १ महिन्यापूरताच रक्ताचा साठा होवू शकतो. दर महिन्याला किमान २५० ते ३०० बॅग आवश्यक आहे. एका आठवड्यात किमान ५० ते १०० बॅग रक्तसंकलन व्हायला पाहीजे. यापेक्षा अधिक रक्त साठविण्याची क्षमता नाही. सामाजिक, राजकीय व अन्य इच्छूक संघटनांनी कोरोना लॉक डाऊनचे नियम पाळून आठवडयातून रक्तदान शिबिर घेऊन  दुर्धर आजारांशी झगडणाऱ्या रुग्णांना जीवनदान द्यायला हवे –
    डॉ. साईनाथ तोडकर, प्रभारी रक्तसंक्रमण अधिकारी, बुलडाणा.

▪ दर महिन्याला किमान २५० ते ३०० बॅग रक्तसंकलन होत असते. मात्र कोरोनाच्या महामारीत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सप्टेंबर महिन्यात केवळ ८४ बॅग रक्त संकलित झाले. मागील साठ्यातून उर्वरीत बॅग मिळून २१८ बॅग इश्यू करण्यात आल्या आहेत.
– संजय सपकाळ, ब्लड बँक सॅन्टेफिक ऑफीसर, बुलडाणा.

▪ महिनानिहाय रक्तसंकलन..
जूलै महिन्यात २०६, ऑगस्ट महिन्यात २९४, सप्टेंबर महिन्यात ८४ बॅग रक्त संकलन करण्यात आले तर जूलैमध्ये २१४, ऑगस्टला २०५ आणि सप्टेंबर महिन्यात मागील साठ्यातून भर टाकत २१८ बॅग इश्यू करण्यात आल्या आहेत.

Advertisements
Previous articleराज्यातील पोलीस अधिकाºयांच्या बदल्या; खामगाव एसडीपीओ प्रदीप पाटील यांची पांढरकवडा येथे बदली
Next article‘फी’ माफ करतो म्हणत वकिलाचा महिलेवर बलात्कार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here