नाकारलेल्या कोरोना मृतकांच्या अस्थिंचे केले विर्सजन.. यापूढेही अंत्यविधी करणार : आ. संजय गायकवाड

0
148

प्रशांत खंडारे |
वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या संकट काळात माणसातील माणुसकी ओशाळत चालली असतांना, बुलडाण्यात “आमदारकी”तील माणूसकीला सलाम करण्याजोगा प्रसंग आज कोरोना मृतकांच्या अस्थि विसर्जना प्रसंगी दिसून आला आहे. कोरोनाने मृत व्यक्तीच्या मृतदेहाच्या अंत्यसंस्काराला त्याचे कुटुंबच संसर्गाच्या भितीपोटी नाकारत असल्याने, या मृतदेहाचा अंत्यविधी पारंपारीकतेने पार पाडण्यासाठी शिवसेनाचे आम. संजय गायकवाड यांनी पुढाकार घेतला. त्यांनी येथील त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत ४ ऑक्टोंबर रोजी विधी उरकत मानवता जपून कोरोनाशी धैर्याने लढा देण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना संसर्गाने अवघ्या जगाला हैराण केले आहे. या भयंकर आपत्तीमूळे जिल्ह्यात ७ हजारावर कोरोना रुग्ण बाधित झाले आहेत. तर कोरोना मृतकांचा आकडा शंभरावर गेला आहे. कोरोनाने गरीब श्रीमंत असा भेदभाव ठेवला नसला तरी, कोणत्याही आपत्तीचा पहिला बळी गरीब ठरतो हे काळाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. कोरोनामूळे अनेकांचा मृत्यू झाल्या नंतर काहीं कुटुंब व नातेवाईकांनी कोरोनाच्या दहशतीमूळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे व मृतदेह स्विकारण्याला नकार देण्याचे प्रकार समोर आले आहे.ज्या व्यक्तीने आपल्या कुटुंबाला जगविले तेच मृत्यू अंती मृतदेहाच्या अंत्यविधीला झिडकारीत असल्याचे संवेदनाहीन चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामूळे कुठे मेली माणसातील माणुसकी?कुठे गेला प्रेमजिव्हाळा?कुठे हरवल्या माणुसकीच्या संवेदना?कुठे गेले सामाजिक भान?सामाजिक दायित्व? खरच विज्ञानाच्या युगात माणूस माणसाला विसरत चालला का?असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आ. संजय गायकवाड यांनी स्वतःहून पुढाकार घेत ३ सप्टेंबर रोजी कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या आस्थिचे विधिवत रक्षा सावडण्याचा व विसर्जनाचा सोपस्कार त्रिशरण चौकातील स्मशानभूमीत पार पाडला.
स्मशानभूमीत १ ते दिड महिन्यापासून कोरोना मृतकांची रक्षा तशीच पडून होती. यापूढेही कोरोना मृतकांचा अंतिम संस्कार व अस्थिचे विसर्जन शिवसेना करेल आसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी गजानन दांदळे, मुन्ना बेडवाल, ओमसिंग राजपूत, कुणाल गायकवाड, लखन गाडेकर, बाळू धुड यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी आ. गायकवाड व शिवसैनिकांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली.

कोरोनाशी लढा द्या…
कोरोनाच्या संकटकाळात शासन, प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, डॉक्टर्स व त्यांचा स्टाफ, पोलीस यंत्रणा, जिल्हाधिकारी ते अंगणवाडी सेविकांपर्यंतचे सर्व घटक, सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते आदी सर्वजण ज्या पद्धतीने कर्तव्य बजावत आहेत ते माणुसकी व मानवता यांचे सर्वोच्च प्रतीक आहे.त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे अशावेळी प्रत्येकाने कोरोनाशी शांततामय मार्गाने लढा द्यावा, असे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी या निमित्ताने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here