हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद विशेष गाडया आता दररोज धावणार

0
405
शेगाव: रेल्वे प्रशासनातर्फे यात्री सुविधा साठी दोन गाड्यांच्या संचालन मध्ये वाढ करण्यात आली आहे.पहिले हावडा मुंबई मेल व हावडा अहमदाबाद या दोन गाड्या त्रीसाप्ताहिक मध्ये चालवल्या जात होत्या.परंतु प्रवाशांच्या सोयीसाठी आता हावडा मुंबई मेल 6 ऑक्टोबर पासून तर हावडा अहमदाबाद 7 ऑक्टोबर पासून दररोज धावणार आहेत. या गाड्यांचा थांबा आणि वेळ तेच राहील. गाडी क्रमांक 02810 अप हावडा मुंबई मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन वरून  6 ऑक्टोबर पासून दररोज धावेल. गाडी क्रमांक 02809 डाऊन मुंबई हावडा मेल विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन 7ऑक्टोबर  पासून दररोज धावेल.
          या गाडयाना देवळाली ,नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर,बडनेरा या स्थानकावर थांबा राहील.गाडी क्रमांक 02834 अप हावडा अहमदाबाद विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन 07 ऑक्टोबर पासून दररोज धावेल. गाडी क्रमांक 02833 डाऊन अहमदाबाद – हावडा विशेष गाडी ही प्रस्थान स्टेशन 10 ऑक्टोबर पासून दररोज धावेल.
या गाड्याना – जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा,जलंब, शेगाव, अकोला, मुर्तीजापुर, बडनेरा आदि ठिकाणी थांबा राहील.
          तरी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.
Advertisements
Previous articleराष्ट्रीय दुखवट्याची बुलडाणा कारागृहाकडून अवहेलना
Next articleपत्नी नांदायला येत नाही म्हणून पित्याने चिरला तीन वर्षाच्या मुलाचा गळा; स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here