नाफेड अंतर्गत आधारभूत किंमत योजनेच्या उडीद, मुग व सोयोबीन खरेदी केंद्राचा आ. आकाशदादा फुंडकर यांच्याहस्ते शुभारंभ

0
212

खामगाव: नाफेड अंतर्गत आधारभूत किंमत योजनेतंर्गत उडीद, मूग, सोयाबीन खरेदी केंद्राचा खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
शेतकऱ्याच्या मालाला आधारभूत किंमत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला माल केंद्रावरच आणावे असे आवाहन ह्यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी केले. ह्यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्री बाबुराव सेठ लोखंडकार, कृषि उत्पन्न बाजार समिती सचिव मुकुटराव भिसे, खविस चे व्यवस्थापक बोराडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ह्यावेळी वजन काट्याचे पूजन करण्यात येऊन आमदार आकाश फुंडकर यांच्याहस्ते उपस्थित शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Advertisements
Previous articleशहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास हेच ध्येय – आ. डॉ. संजय कुटे
Next articleकृषी कायद्याला विरोध करणाºया राज्य सरकारचा निषेध; शेगावात भाजप कार्यकर्त्यांनी केली अध्यादेशाची होळी!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here